रम्मीकल्चर या स्किल-आाधरित ऑनलाइन गेम्स कंपनी गेम्सक्राफ्टच्या प्रमुख प्लॅटफॉर्मने भारतातील ऑनलाइन गेमिंग उद्योगामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना सुरक्षित व निष्पक्ष गेमिंग वातावरण देण्याप्रती आपली कटिबद्धता अधिक दृढ केली आहे. बाजारपेठ आर्थिक वर्ष २०२८ पर्यंत ७.५ बिलियन अमेरिकन डॉलर्सपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा असताना रम्मीकल्चरद्वारे नेतृत्वित ऑनलाइन रम्मी क्षेत्र या वाढीमध्ये अग्रस्थानी आहे, ज्यामधून नाविन्यता, जबाबदारी आणि खेळाडू अनुभवावरील प्रबळ फोकस दिसून येतो.
भारतातील स्किल-आधारित गेमिंग: प्रगतीशील उद्योग
भारतातील ऑनलाइन गेमिंग क्षेत्रात झपाट्याने विकास होत आहे, जे देशातील आर्थिक प्रगतीमध्ये मोठ्या प्रमाणात योगदान देत आहे. उद्योग रिअल-मनी गेमर्स (आरएमजी)मध्ये मोठ्या वाढीसह २० टक्के सीएजीआर दराने वाढण्याची अपेक्षा आहे. या वाढीसाठी प्रमुख कारण आहेत, कार्ड-आधारित रिअल-मनी गेम्स जसे रम्मी, ज्याचे आरएमजी बाजारपेठेत सर्वाधिक प्रमाण आहे आणि भारतभरातील खेळाडूंच्या वैविध्यपूर्ण समूहाला एकत्र आणत आहे.
रम्मीकल्चर: जबाबदार गेमिंगमध्ये लीडर
२०१७ मध्ये स्थापना करण्यात आलेला रम्मीकल्चर झपाट्याने ऑनलाइन रम्मीसाठी सर्वात विश्वसनीय व प्रमुख प्लॅटफॉर्म बनला आहे, तसेच नाविन्यता आणि खेळाडूंच्या स्वास्थ्यावरील फोकससह उद्योगाचे नेतृत्व करत आहे. हा प्लॅटफॉर्म त्यांच्या अत्याधुनिक तंत्रज्ञान फ्रेमवर्कसाठी ओळखला जातो, जो सुरक्षित गेमप्ले, निष्पक्ष ऑपरेशन्स देतो आणि खेळाडूंच्या गरजांची पूर्तता करण्यावर प्रबळ भर देतो.
रँडम नंबर जनरेशन (आरएनजी) नोबोट सिस्टम्स आणि एसएसएल-सेक्युअर्ड पेमेंट गेटवेज अशा उद्योग-अग्रणी सुरक्षितता उपायांसह सुसज्ज असलेल्या रम्मीकल्चरला युनोमर रिसर्चने सायबरमीडिया रिसर्च (सीएमआर)* सोबत सहयोगाने ‘इंडियाज नंबर वन रम्मी अॅप’ म्हणून सन्मानित केले आहे. सुरक्षित व विश्वसनीय गेमिंग वातावरण राखण्याप्रती समर्पित रम्मीकल्चर टाइम-आऊट पर्याय, गेम लिमिट्स आणि युअरदोस्तच्या माध्यमातून सायकोलॉजिकल सपोर्ट अशा वैशिष्ट्यांसह जबाबदार गेमिंगमध्ये देखील अग्रस्थानी आहे.
खेळाडूंच्या कौशल्यांना आणि निष्पक्ष खेळाला चालना देणे
रम्मीकल्चर खेळाडूंना त्यांची कौशल्ये अधिक निपुण करण्यासाठी डिझाइन केलेल्या टूल्ससह सक्षम करण्यावर लक्ष केंद्रित करते. प्लॅटफॉर्मची नाविन्यपूर्ण गेम मॉनिटरिंग सिस्टम निष्पक्ष खेळाची खात्री देते, तर त्यांचे प्रगत तंत्रज्ञान खेळाडूंना त्यांचे डावपेच निपुण करण्यामध्ये आणि त्यांची कामगिरी सुधारण्यामध्ये मदत करते. ब्रॅण्डचे मल्टी-इनपुट डीप न्यूरल नेटवर्क मॉडेल एसपीएडीईनेटला खेळाडूंना त्यांची कौशल्ये प्रबळ करण्याप्रती आणि त्यांचे गेमप्ले विकसित करण्याप्रती मदत करण्यास योगदान देण्यासाठी प्रतिष्ठित इंटरनॅशनल आयईईई कॉन्फरन्स ऑन एआय २०२४ मध्ये सन्मानित करण्यात आले आहे.
स्थानिक व राष्ट्रीय यशोगाथा
रम्मीकल्चरचा वाढता खेळाडूवर्ग आहे आणि भारतभरात, विशेषत: पश्चिमी प्रांतांमध्ये प्रबळ उपस्थिती स्थापित केली आहे. महाराष्ट्रातील, विशेषत: पुणे व मुंबई यांसारख्या शहरांमधील ४.९ दशलक्षहून अधिक खेळाडूंनी प्लॅटफॉर्मवर नोंदणी केली आहे. हाय व्हॅल्यू प्लेअर्स (एचव्हीपी)च्या सर्वाधिक आकडेवारीसह पुणे मुंबईपेक्षा सर्वात मोठी बाजारपेठ आहे.
पुण्यामध्ये सरासरी विजयाचा दर २७.७२ टक्के नोंदवण्यात आला आहे, ज्यानंतर २७.६८ टक्क्यांसह मुंबईचा क्रमांक आहे आणि उर्वरित महाराष्ट्रात २८.६२ टक्के विजयाचा दर नोंदवण्यात आला आहे. या आकडेवारींमधून निदर्शनास येते रम्मी स्किल गेम आहे, जेथे खेळाडूंचे स्थान किंवा डेमोग्राफिक्सपेक्षा त्यांच्या क्षमतांवरून यश निर्धारित होते.
भविष्याकडे वाटचाल
रम्मीकल्चर नवीन वैशिष्ट्ये सादर करत, रोमांचक स्पर्धांचे आयोजन करत आणि गेमप्लेमध्ये नाविन्यपूर्ण सुधारणा करत खेळाडूंचा अनुभव उत्साहित करण्याप्रती समर्पित आहे. ब्रॅण्ड विकसित होत असताना विश्वास, कौशल्य विकास आणि जबाबदार गेमिंगप्रती त्यांची कटिबद्धता रम्मीकल्चरला भारतातील विस्तारित होत असलेल्या ऑनलाइन गेमिंग लँडस्केपमध्ये अग्रस्थानी ठेवते.
*युनोमरने १४ ऑक्टोबर ते २३ ऑक्टोबर २०२४ पर्यंत केलेल्या संशोधनामध्ये भारतातील अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, नवी दिल्ली, कोलकाता, मुंबई व पुणे या सात प्रमुख शहरांमधील १,०४४ रिअल मनी गेमर्सचे सर्वेक्षण केले. गेम्सक्राफ्टच्या रम्मीकल्चरचे खेळाडू इतर रम्मी अॅप्सपेक्षा जास्त खर्च करत आहेत (सर्वेक्षण डेटानुसार रम्मी अॅप्समधील खर्चावर आधारित).
1https://www.lumikai.com/post/indian-gaming-industry-poised-for-strong-growth-projected-to-reach-7-5-bn-by-fy28
2https://www.lumikai.com/post/indian-gaming-industry-poised-for-strong-growth-projected-to-reach-7-5-bn-by-fy28
रम्मीकल्चर बाबत
रम्मीकल्चर हा २.५ कोटीहून (२५ दशलक्ष) अधिक खेळाडू असलेला भारतातील झपाट्याने विकसित होत असलेला ऑनलाइन रम्मी प्लॅटफॉर्म आहे आणि जगातील सर्वात मोठी ऑनलाइन रम्मी टूर्नामेंट आयोजित करण्यासाठी ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये सामील आहे. सर्व वापरकर्त्यांना उत्साहवर्धक, कायदेशीर, सुरक्षित व निष्पक्ष गेमप्लेचा आनंद देण्यासाठी प्लॅटफॉर्म आरएनजी व नो बोट प्रमाणित आहे. तसेच प्लॅटफॉर्मला ISO 9001:2005 प्रमाणन देखील मिळाले आहे.
विभागातील सर्वोत्तम ग्राहक सेवा, ऑफर्स व प्लेअर रिवॉर्ड्ससह उल्लेखनीय ऑनलाइन रम्मी गेमिंग अनुभव देण्यासाठी तंत्रज्ञानाच्या क्षमतेवर विश्वास असलेल्या रम्मीकल्चरचे गेम्स अत्यंत युजर-अनुकूल यूआयवर डिझाइन करण्यात आले आहेत आणि पहिल्यांदाच गेम खेळणाऱ्या खेळाडूंना सोईस्करपणे गेम समजण्याची व विनासायास खेळण्याची सुविधा देतात. प्लॅटफॉर्म खेळाडूंना त्यांच्या रम्मी कौशल्यांचा वापर करत विविध आकर्षक बक्षीसे जिंकण्याची उत्तम संधी देतो.
गेम्सक्राफ्ट बाबत
२०१७ मध्ये लाँच झाल्यापासून ऑनलाइन स्किल-आधारित गेम्स कंपनी गेम्सक्राफ्टने स्किल-आधारित ऑनलाइन गेम्स समुदायामध्ये खेळाडूंच्या वाढत्या समूहाच्या गरजांची पूर्तता केली आहे. हा आता देशातील सर्वात मान्यताकृत गेम्स ब्रॅण्ड असण्यासह अत्यंत लोकप्रिय गेमिंग प्लॅटफॉर्म्सचे गंतव्य आहे. गेम्सक्रॉफ्ट तंत्रज्ञान व गेमिंगच्या संयोजनासह कार्यरत आहे, तसेच लाखो वापरकर्त्यांना सुरक्षित, उच्च दर्जाचा अनुभव देत आहे. कंपनीला क्षेत्राबाबत असलेल्या सखोल माहितीमुळे स्किल-आधारित गेमिंगमध्ये नवीन व सुरक्षित संकल्पनांना चालना मिळते.