क्रोमाने तुमच्या शहरात आणली एसी आणि एयर कूलरची त्याच दिवशी डिलिव्हरीची सुविधा निवडक एयर कंडिशनर आणि एयर कूलर संध्याकाळी ६ वाजण्याच्या आधी ऑर्डर करा आणि त्याच दिवशी डिलिव्हरी मिळवा.

तारां कित Avatar

Pune, 25 फेब्रुवारी २०२५: क्रोमाने आपल्या ग्राहकांना वाढत्या उष्म्यापासून दिलासा मिळवून देण्यासाठी एयर कंडिशनर व एयर कूलरची डिलिव्हरी त्याच दिवशी देण्याची सुविधा सुरु केली आहे. क्रोमाच्या गॅजेट्स आणि छोट्या उपकरणांची त्वरित डिलिव्हरी सेवा अतिशय यशस्वीपणे सुरु आहे. त्यापासून प्रेरणा घेऊन या ब्रँडने आपल्या ग्राहकांसाठी उन्हाळ्यातही गारवा मिळवणे सोपे केले आहे. क्रोमाचे ग्राहक आता जराही विलंब न लावता लगेचच गारव्याचा आनंद घेऊ शकतील.

आपल्या सुविधेनुसार हव्या त्या चॅनेलमधून खरेदी करण्याचा सहजसोपा ओम्नीचॅनेल शॉपिंग अनुभव प्रदान करण्यासाठी क्रोमा नेहमीच प्रयत्नशील असतो, त्यांचाच एक भाग म्हणून आता तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोर, croma.com आणि टाटा नेउ ऍपवर संध्याकाळी ६ वाजण्याच्या आधी ऑर्डर केलेल्या निवडक एसी आणि एयर कूलरची डिलिव्हरी त्याची दिवशी देण्याची सुविधा सुरु करण्यात आली आहे.

इन्फिनिटी रिटेल लिमिटेड (क्रोमा) चे सीईओ शिबाशिष रॉय यांनी सांगितले, “उन्हाळा सुरु झाला आहे, तुम्हाला त्याचा जराही त्रास सहन करावा लागू नये यासाठी एसी आणि एयर कूलरची त्याच दिवशी डिलिव्हरी देण्याची सुविधा आम्ही सुरु करत आहोत. क्रोमाला तुमच्या अजून जवळ आणण्याच्या आमच्या प्रयत्नांचा हा एक भाग आहे. आम्हाला खूप आनंद होत आहे की, २८ शहरांमध्ये त्याच दिवशी डिलिव्हरीची सुविधा आम्ही देत आहोत.”

उन्हाळ्यातही गारवा मिळवणे आता सोपे आहे! तुमच्या जवळच्या क्रोमा स्टोर किंवा ऑनलाईन croma.com आणि टाटा नेउ वर खरेदी करा आणि एसी, कूलरची डिलिव्हरी त्याची दिवशी मिळवा. तुम्हाला आराम मिळवून देणे ही आमची प्राथमिकता आहे.

Tagged in :

तारां कित Avatar