Saturday, September 12, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्टने लॉजिस्टिक्‍समध्‍ये विकास आणि कार्यक्षमतेला गती देण्‍यासाठी टाटा मोटर्ससोबत केली...

श्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्टने लॉजिस्टिक्‍समध्‍ये विकास आणि कार्यक्षमतेला गती देण्‍यासाठी टाटा मोटर्ससोबत केली हातमिळवणी

पुणे, 28 फेब्रुवारी २०२५: १६ वर्षांहून अधिक काळापासून श्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्ट महाराष्‍ट्रातील लॉजिस्टिक्‍स क्षेत्रातील विश्‍वसनीय कंपनी आहे, तसेच प्रांतातील उद्योगांना विश्‍वसनीय व कार्यक्षम सेवांसह पाठबळ देण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे. त्‍यांच्‍या यशामागील मुलभूत बाब म्‍हणजे भारतातील आघाडीची व्‍यावसायिक वाहन उत्‍पादक कंपनी टाटा मोटर्ससोबतचा प्रबळ सहयोग, जी प्रगत व विश्‍वसनीय सोल्‍यूशन्‍ससाठी ओळखली जाते. हा सहयोग श्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्टला नवीन महत्त्वपूर्ण टप्‍पे गाठण्‍यास आणि त्‍यांच्‍या कार्यसंचालनांमध्‍ये वाढ करण्‍यास मदत करण्‍यामध्‍ये महत्त्वाचा राहिला आहे.

आज, कंपनीचा २०० हून अधिक वाहनांचा प्रबळ ताफा आहे, ज्‍यामध्‍ये शहरी व आंतरशहरीय लॉजिस्टिक्‍ससाठी डिझाइन करण्‍यात आलेला टाटा अल्‍ट्रा १०१२ आणि लांब अंतरापर्यंत हेवी-ड्युटी कार्यसंचालनांना सहजपणे हाताळण्‍यासाठी डिझाइन करण्‍यात आलेला शक्तिशाली टाटा प्राइम मूव्‍हर्सचा समावेश आहे. टाटा मोटर्सचा कनेक्‍टेड वेईकल प्‍लॅटफॉर्म फ्लीट एजचा फायदा घेत कंपनीने आपल्‍या ताफ्याची कार्यक्षमा सानुकूल केली आहे आणि कार्यसंचालनांना सुव्‍यवस्थित केले आहे, ज्‍यामुळे औद्योगिक गरजांसाठी विश्‍वसनीय लॉजिस्टिक्‍स सोल्‍यूशन्‍स देण्‍याप्रती कंपनीची कटिबद्धता अधिक दृढ झाली आहे.

श्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्टचे व्‍यवस्‍थापकीय संचालक श्री. गणेश कांताराम बोत्रे म्‍हणाले, “आम्‍हाला टाटा मोटर्ससोबतच्‍या आमच्‍या सहयोगाच्‍या सातत्‍यपूर्ण यशाचा अत्‍यंत अभिमान वाटत आहे. प्रबळ सेल्‍स नेटवर्कचे पाठबळ असलेले त्यांचे विश्‍वसनीय सोल्‍यूशन्‍स आम्‍हाला विश्‍वसनीय, किफायतशीर व स्‍केलेबल लॉजिस्टिक्‍स सोल्‍यूशन्‍स वितरित करण्‍यासाठी सक्षम करण्‍यामध्‍ये साह्यभूत राहिले आहेत. वरचढ ठरणारी बाब म्‍हणजे आमच्‍या ड्रायव्‍हर्सचे अभिप्राय, जे कोणत्‍याही अस्‍वस्‍थतेशिवाय लांब अंतरापर्यंत प्रवास करण्‍याबाबत सांगतात. ते सतत टाटा मोटर्सच्‍या वेईकल्‍सचा आरामदायीपणा व कार्यक्षमतेचे कौतुक करतात, ज्‍यामुळे प्रत्‍येक प्रवास आरामदायी व विनासायास होतो.”

श्री जोपादेवी ट्रान्‍सपोर्ट विकास व विस्‍तारीकरणाच्‍या दिशेने वाटचाल करत असताना आपल्‍या कार्यरत क्षमता वाढवण्‍याप्रती, नाविन्‍यपूर्ण पद्धतींचा अवलंब करण्‍याप्रती आणि लॉजिस्टिक्‍स उद्योगामधील नेतृत्‍व अधिक दृढ करण्‍याप्रती समर्पित आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments