Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री गोवर्धन पीठाचे प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज  ...

श्री गोवर्धन पीठाचे प.पू. जगद्गुरु शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज  दि.३१ पासून तीन दिवस पुण्यातः १ फेब्रुवारी रोजी वेदयुक्त दर्शन, विज्ञान व व्यवहार विषयावर धर्मसभा

 

 

पुणे, दि.३० जानेवारी: जगन्नाथपुरी येथील श्री गोवर्धन पीठाचे प.पू. जगदगुरू शंकराचार्य श्री निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज यांच्या पवित्र दर्शनाचा लाभ पुणेकरांना होणार आहे. महाराजांचे आगमन बुधवार, दि.३१ जानेवारी रोजी सकाळी ९.०० वा. होणार आहे. याच दिवशी दुपारी १२.३० वा. महाप्रसाद व सायं. ५.३० वा. संगोष्ठी व महाप्रसादाचे वाटप होईल. गुरुवार, दि. १ फेब्रुवारी रोजी लॉ कॉलेज रोड येथील शांतीशीला क्रीडा संकुल येथे त्यांच्या वेदयुक्त दर्शन, विज्ञान व व्यवहार या विषयावर धर्मसभेचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सर्व पुणेकरांसाठी असून महाराजांच्या पवित्र दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजक अ‍ॅड. सीमा तिवारी यांनी केले. श्री गोवर्धन पीठाच्या आदित्य-आनंद वाहिनीतर्फे कार्यक्रम होणार आहे.

शुक्रवार, दि.२ फेब्रुवारी रोजी स. ११.३० वा. संगोष्ठी, दीक्षा व महाप्रसाद दिला जाईल. त्यानंतर जगद्गुरू शंकराचार्य हे मुंबईला रवाना होतील. दरम्यान तीन दिवस त्यांचा मुक्काम सौ. अवंतिका व श्री. अशिम अशोक पाटील यांच्या शांता रेसिडेन्सी येथे होणार आहे.

शांतिशीला सोसायटीचे डॉ. नरेंद्र वैद्य, हेमंत येरवडेकर, वासंती पुरोहित यांच्यासह विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची पूर्वतयारी केली आहे. येथे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आध्यात्मिक, उद्योग-व्यवसाय क्षेत्रातील मान्यवर ऊत्स्फूर्तपणे सहभागी होत आहेत. अशी माहिती संस्कृतचे गाढे अभ्यासक पं. वसंत गाडगीळ यांनी दिली.

प.पू. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज १४५ वे शंकराचार्य

पुरुषोत्तम क्षेत्र पुरी येथे गोवर्धन पीठाची स्थापना इ. स. ४८६ वर्षांपूर्वी झाली. आचार्य पद्मपाद गोवर्धन पीठाचे सर्वप्रथम शंकराचार्य यांच्या रुपाने अभिषिक्त झाले. गोवर्धन पीठाच्या शंकराचार्य परंपरेतील प.पू. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज हे १४५ वे शंकराचार्य म्हणून कार्यरत आहेत. स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज प्रसिद्ध गणितज्ञ व विद्वान आहेत. त्यांनी या विषयावर दोनशेहून अधिक पुस्तके प्रकाशित केली आहेत. त्यांची सर्व पुस्तके स्व. भारती कृष्ण तीर्थजी महाराज यांना समर्पित आहेत. वैज्ञानिक, दार्शनिक आणि व्यवहारिक या तीनही निकषांवर जे योग्य पद्धतीने सिद्ध होईल तेच अनुकरणीय आहे, असे श्री जगद्गुरू शंकराचार्य स्वामी निश्चलानन्द सरस्वती स्वामी महाराज सांगतात ते देशाच्या कानाकोपर्‍यात वेद व राष्ट्रीय एकात्मता इत्यादींचा उपदेश करतात.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments