पुणे –
रविवार दिनांक २३/०३/२०२५ रोजी कसबा गणपती मंदिरा समोर, कसबा पेठ येथे थोर क्रांतिकार शहीद भगतसिंग, शहीद शिवराम हरी राजगुरु, शहीद सुखदेव थापर, यांना पतित पावन संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यासाठी जाहीर सभा आयोजित केली आहे. (वेळ संध्या ६.०० वा.) सदर सभेला महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष श्री. सोपानराव देशमुख प्रांत सरचिटणीस नितीनजी सोनटक्के, प्रांत उपाध्यक्ष बाळासाहेब भामरे, प्रांत उपाध्यक्ष राजाभाऊ पाटील, राष्ट्रीय स्वयमसेवक संघाचे सहकार्यवाह श्री प्रसादजी लवळेकर, शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर, शहर कार्याध्यक्ष गोकुळ शेलार, शहर पालक मनोज नायर, उपाध्यक्ष पप्पू टेमघरे, सरचिटणीस मनोज पवार, उपाध्यक्ष अरविंद परदेशी, निलेश जोशी, विजय गावडे. या सभेसाठी सुमारे चार ते पाच हजार कार्यकर्ते, महिला उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती पतित पावन संघटनेतर्फे प्रदेश प्रवक्ता अलि दारुवाला यांनी दिली.


