पुणे,21 मार्च 2025 : गुंतवणूक व्यावसायिकांची जागतिक संघटना असलेल्या सीएफए इन्स्टिट्युट ने ‘क्लिक्स ॲन्ड क्रेडिबिलिटी : अंडरस्टँडींग फिनफ्लुएंसर्स रोल इन इनव्हेस्टमेंट डिसिजन्स’ हा बहुप्रतिक्षित इंडिया फिनफ्लुएंसर रिपोर्ट सादर केला. हा रिपोर्ट भारतातील किरकोळ गुंतवणूकदार क्षेत्रात गुंतवणूक निर्णयांना आकार देण्यात फायनान्शियल इनफ्लुएंसर्स किंवा फिनफ्लुएंसरच्या वाढत चाललेल्या प्रभावाचे व्यापक विश्लेषण करतो. 1600 हून अधिक गुंतवणूकदारांच्या सर्व्हेक्षणावर आणि 51 प्रमुख फायनान्शियल इनफ्लुएंसर्सच्या सखोल विश्लेषणावर आधारित हा अभ्यास याबाबतीतील क्षमता आणि तोटे उघड करतो.
उल्लेखनीय बाब म्हणजे रिपोर्टमध्ये विश्लेषण केलेल्या फायनान्शियल इनफ्लुएंसर्सपैकी फक्त 2% लोकं सेबी कडे नोंदणीकृत आहेत,तरीही 33% स्पष्टपणे खरेदी किंवा विक्रीच्या शिफारसी देतात. यामुळे त्यांचा सल्ला,जबाबदारी आणि विश्वासार्हतेवर प्रश्न उपस्थित होतो.
गेल्या 5 वर्षात भारतात इक्विटी मार्केटमध्ये किरकोळ गुंतवणूकदारांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे.शेअर बाजारासाठी ही एक प्रोत्साहनदायक बाब असली तरी भांडवली बाजार नियामक असलेल्या सेबीच्या निष्कर्षावरून असे दिसून येते की यातील अनेक गुंतवणूकदार सट्टेबाज असल्यामुळे त्यांचे मोठे नुकसान होत आहे.माहिती नसलेल्या किरकोळ गुंतवणूकदारांचा बेकायदेशीर फायदा मिळविणाऱ्या फिनफ्लुएंसर्सवर व बेजबाबदार गुंतवणूकीला आळा घालण्यासाठी सेबी ने अनेक वेळा प्रामाणिक प्रयत्न केले आहेत,तरी भारतातील फिनफ्लुएंसर्स क्षेत्राला नियमित करण्यासाठी अजून बराच पल्ला गाठायचा आहे.या प्रक्रियेचा एक महत्त्वाचा भाग म्हणजे गुंतवणूकदारांचे गुंतवणूक वर्तन समजून घेणे आणि फिनफ्लुएंसर्स ने तयार केलेल्या आशयाचा आढावा घेणे.
या दिशेने रिपोर्टमधील निष्कर्ष गुंतवणूक दारांवर असलेल्या फिनफ्लुएंसर्सच्या प्रभावावर प्रकाश टाकतो. 82% फॉलोअर्स ने असे म्हटले आहे की,त्यांनी फिनफ्लुएंसर्स कडून मिळालेल्या गुंतवणूक सल्ल्यानुसार कृती केली आहे. यापैकी 72% फॉलाअर्सना आर्थिक फायदा झाला आहे. मात्र रिपोर्टमध्ये अंर्तनिहित जोखीम देखील अधोरेखित करण्यात आली आहे. 40 वर्षे किंवा त्यापुढच्या वयाच्या अनुभवी गुंतवणूकदारां
पैकी 14%


