Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorized'आइकिया'ची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील ६२ नव्या ...

‘आइकिया’ची महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधील ६२ नव्या बाजारपेठांमध्ये घरपोच वितरण सुविधेची घोषणा ग्राहक एक फेब्रुवारीपासून www.ikea.in या वेबसाइटवर, आइकिया शॉपिंग ॲप आणि ‘शॉप बाय फोन’ सेवेद्वारे आवडत्या होम फर्निशिंग उत्पादनांची ऑर्डर देऊ शकतात.

भारत, ३० जानेवारी २०२४ : आइकिया (IKEA) या जगातील अग्रगण्य स्वीडिश ओम्निचॅनल होम फर्निशिंग रिटेल विक्रेत्या कंपनीने महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश राज्यांमधील 62 जिल्ह्यांमधील हजारो पिन कोडवर ई-कॉमर्स वितरण सुरू करण्याची घोषणा केली आहे. आइकिया स्टोअर्समध्ये खरेदीसाठी जवळपासच्या शहरांमधून येणारे हजारो ग्राहक, त्यांचा उत्साह, प्रचंड मागणी आणि वारंवार भेटी देण्याचे प्रमाण हे लक्षात घेऊन कंपनीने ई – कॉमर्स सुविधेचा विस्तार केला आहे.

आता या नव्या सुविधांमुळे ग्राहक आपल्या घरासाठी उत्तम ७५०० हून अधिक आकर्षक डिझाइन, उत्तम दर्जा, टिकाऊ, कार्यक्षम आणि किफायतशीर गृहसजावटीच्या उत्पादनांची विस्तृत श्रेणी घरबसल्या पाहू शकतील आणि खरेदी करू शकतील. यासाठी ते आइकिया ॲप, www.ikea.in ब्रँड वेबसाइट किंवा फोनद्वारे खरेदी सहाय्य सेवेद्वारे ऑनलाइन ऑर्डर करू शकतील.

आइकिया इंडियाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आणि चीफ सस्टेनेबिलिटी ऑफिसर सुसान पुल व्हेरेर म्हणल्या, “आइकियाला महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमधून गेल्या पाच वर्षात मोठ्या प्रमाणात ग्राहकांचे प्रेम आणि विश्वास मिळाला आहे. आमच्या ग्राहकांसाठी अधिक सुलभ, सोयीस्कर आणि खऱ्या अर्थाने ओम्नी चॅनेल उपलब्ध करण्याच्या दृष्टीने आम्ही या बाजारपेठांमध्ये आमची पोहोच आणखी वाढवण्यावर भदीला आहे. असंख्य भारतीयांना आमची उत्पादने उपलब्ध करून देण्यासाठी ई- कॉमर्समध्ये मोठी क्षमता आहे, त्यामुळे आम्हाला या सुविधेचा विस्तार करण्याची प्रेरणा मिळाली असून, ऑनलाइन माध्यमातून ग्राहकांकडून होणारी मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही या राज्यांमधील आमच्या विद्यमान स्टोअरच्या वितरण क्षमतेचाही फायदा घेऊ. ही उदयोन्मुख शहरे ऑनलाइन रिटेल वाढीची प्रमुख केंद्रे आहेत आणि भारतातील आमच्या अनेक ग्राहकांना घरबसल्या आइकिया अनुभव देण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.”

ग्राहक आइकियाचे ॲप आणि वेबसाइट सहजपणे वापरू शकतात. घर सुंदर करण्यासाठी उत्तमोत्तम वस्तूंची खरेदी करणे सुलभ व्हावे यासाठी गृह केंद्रीत डिझाइन, उत्पादन फीड, रेटिंग आणि पुनरावलोकन यांची मदत होते. याशिवाय ग्राहक विविध ऑफरची माहिती घेऊ शकतात. आइकिया कुटुंब सदस्य म्हणून साइन अप केल्यावर विशेष सवलतींसह कमी किंमतीतील उत्पादनांचा लाभ घेऊ शकतात. तसेच वेबसाइटवरील ग्राहक सेवा विभागाला भेट देऊन ग्राहक त्यांच्या स्वयंपाकघराचे, लिव्हिंग रूमचे डिझाइन, इंटीरियर डिझाइन सेवा आदी विविध सेवांचाही लाभ घेऊ शकतात.

आइकिया ला या बाजारपेठेतील उपयुक्तता आणि स्थान बळकट करण्यात मदत करणाऱ्या ट्रेंडबद्दल बोलताना, सुसाने पुढे म्हणाल्या, “भारतीय लोकांचा त्यांच्या घरांबद्दल खूप सकारात्मक दृष्टीकोन आहे. आपले घर स्वतःसाठी आणि कुटुंबातील प्रत्येकासाठी शारीरिक, भावनिक आणि मानसिक समधानाचे ठिकाण बनवण्यासाठी ते स्वत: महत्त्वाची भूमिका बजावतात. आमच्या अलीकडील ‘लाइफ ॲट होम’ अहवालात, भारतीय घरांसाठी चांगली स्टोअरेज सोल्यूशन्स आणि झोपेवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आवश्यक गोष्टींची गरज अधोरेखित केली आहे. घर आकर्षक, सुदंर करण्यासाठी आमच्याकडे अनेक उपाय असून, ते परवडणारे आहेत आणि आता ते सर्वांसाठी सहज उपलब्ध होऊ शकतात, याची आम्ही खात्री करत आहोत.”

सध्या, विद्यमान बाजारपेठेतील ग्राहकांच्या ७२ टक्के ऑर्डर इलेक्ट्रिकल वाहनांद्वारे पूर्ण केल्या जातात. आता नव्या विस्ताराच्या पार्श्वभूमीवर आइकियाच्या पुरवठा साखळीची क्षमता आणखी वाढविण्याचे उद्दिष्ट आहे, ज्यामुळे ती अधिक भक्कम होईल.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments