Saturday, August 15, 2026
Google search engine
HomeUncategorizedफर्स्ट वर्ल्ड रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुण्यातील विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व

फर्स्ट वर्ल्ड रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये पुण्यातील विद्यार्थी करणार भारताचे प्रतिनिधित्व

पुणे, १ फेब्रुवारी २०२४ : गोवा रोबोटिक्स इंटरनॅशनल फेस्टिव्हलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या फर्स्ट टेक चॅलेंज (एफटीसी ) ‘इंडिया नॅशनल रोबोटिक्स चॅम्पियनशिप’ मध्ये पुण्यातील ‘रोबोमाइंड्स’ या संस्थेच्या शालेय विद्यार्थ्यांच्या संघाने यश संपादन केले आहे. ‘रोबोमाइंड्स’च्या टीम हॉरक्रक्सेस ने या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल इन्स्पायर पुरस्कार पटकावला आहे.

टीम हॉरक्रक्सेस ने भारत, श्रीलंका आणि कझाकस्तान मधील 58 इतर संघांविरुद्ध चार दिवसांच्या कालावधीत, त्यांच्या रोबोट, ‘रॉबी 2.0’ द्वारे सांघिक कार्य आणि तांत्रिक कौशल्याचे प्रदर्शन करत विजेतेपद जिंकण्यासाठी स्पर्धा केली.

एफटीसी ही एक आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहे, जिथे जगभरातील संघांना स्पर्धा करण्यासाठी रोबोट डिझाइन करणे, तयार करणे,प्रोग्राम आणि कार्यान्वित करण्याचे आव्हान दिले जाते. सहभागाद्वारे, विद्यार्थी विज्ञान, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, गणित आणि डिझाइन ( एसटीईएम-डी) मधील कौशल्ये विकसित करतात आणि कठोर परिश्रम, नाविन्यता आणि सांघिक कार्याच्या मूल्यांचे महत्व लक्षात घेत अभियांत्रिकी सिद्धांतांचा सराव करतात. भारताच्या विकासासाठी आणि भविष्यातील जागतिक वर्चस्वासाठी ही कौशल्ये आवश्यक आहेत.

स्पर्धेत वापरण्यात आलेला रोबो हा विशिष्ट डिझाईन ने तयार करण्यात आला होता आणि पुण्यातील बहुसंख्य मुलींच्या संघाने ऑटोनॉमस मोड पद्धतीने कार्य करण्यासाठी प्रोग्राम केला होता, ज्यामध्ये 11 ते 16 वयोगटातील रोनव परांजपे, 11 (अभिनव विद्यालय) कौशिक अन्नदाता, 12 (पीआयसीटी मॉडेल स्कूल), सिद्धार्थ राजगोपाल-बिस्त, 12 (कल्याणी स्कूल), आर्या सुराणा, 12 (सेंट मेरी स्कूल), महेक भाटिया, 13 (विबग्योर हाय बालेवाडी), दर्श आहुजा, 13 (कल्याणी स्कूल) ),यशोदा राजनल, 13 (डॉ. कलमाडी शामराव हाय कन्नड मीडियम स्कूल), प्रणव नटेश, 14 (रवींद्रनाथ टागोर स्कूल ऑफ एक्सलन्स), अनुष्का बसू, 15 (द ऑर्किड स्कूल), मृण्मय बेहेरे, 15 (डीएलआरसी), आदिती नाटेकर, 15 (डॉ. कलमाडी शामराव हाय कन्नड माध्यम शाळा), इरा करमरकर, 16 (एम. पी. कॉलेज), तेजस बापट, 16 (एम. पी. कॉलेज), अदिती शर्मा, 16 (इंडस इंटरनॅशनल स्कूल), आणि रचना माळी, 16 (एसपी ज्युनियर कॉलेज) यांचा समावेश होता. संघातील काही सदस्यांनी मागील वर्षांमध्ये फर्स्ट लेगो लीग (एफएलएल) आणि वर्ल्ड रोबोट ऑलिम्पियाड (डब्ल्यूआरओ) स्पर्धांमध्ये रोबोमाइंड्ससह भाग घेतला होता आणि अनेक आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये देखील भारताचे प्रतिनिधित्व केले होते.एफटीसीमध्ये या सहभागींसाठी प्रवेशाचे हे पहिले वर्ष आहे.

टीम हॉरक्रक्सेस 2.0 आता एप्रिल २०२४ मध्ये ह्यूस्टन, यूएसए येथे होणाऱ्या फर्स्ट वर्ल्ड रोबोटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी सज्ज झाला आहे.जिथे ते सुमारे 70 देशांतील 150 हून अधिक संघांविरुद्ध स्पर्धा करतील.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments