पुणे , 31 जानेवारी २०२४ : सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन पुणे (एसएसपीपी) तर्फे इंडियन सोसायटी फॉर स्टडी ऑफ पेन, आयएसएसपीकॉन २०२४ च्या 38व्या राष्ट्रीय परिषदेचे 2 ते 4 फेब्रुवारी 2024 या कालावधीत पुण्यात आयोजन करण्यात आले आहे.1 फेब्रुवारी रोजी पूर्व परिषद कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या परिषदेत पेन मॅनेजमेंट (वेदना व्यवस्थापन) संबंधित विविध विषयांवर चर्चा करण्यात येणार असून चर्चासत्र, बीज भाषण कार्यशाळा, वैज्ञानिक कार्यक्रमांसह पोस्टर प्रेझेंटेशन यांचा समावेश आहे.आयोजन समितीमध्ये आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.उत्तम सिधये, सचिव डॉ.वर्षाली केनिया ,खजिनदार डॉ.प्रज्ञा भालेराव,वैज्ञानिक कार्यक्रमांच्या अध्यक्ष डॉ.माधुरी लोकापूर यांचा समोवश असणार आहे.पूर्व परिषद कार्यशाळा या भारती हॉस्पिटल व दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल येथे आयोजित करण्यात आल्या असून परिषदेचे आयोजन विमाननगर येथील हयात रिजन्सी येथे करण्यात आले आहे.
आयएसएसपीकॉन २०२४ च्या आयोजन समितीचे अध्यक्ष डॉ.उत्तम सिधये म्हणाले की,वेदना व्यवस्थापन ही भारतातील झपाट्याने वाढणारी शास्त्रीय शाखा आहे,मात्र याबाबत पुरेशी जागृती नाही.वेदना व्यवस्थापनामध्ये अनेक वैद्यकीय स्थितींमध्ये उद्भवणार्या वेदना या व्यवस्थापन तंत्र व जिथे शक्य आहे तिथे बिगर शस्त्रक्रिया तंत्रांद्वारे वेदना कमी करण्यावर भर दिला जातो. यामध्ये शस्त्रक्रियेनंतर होणार्या वेदना,पाठीच्या वेदना,गुडघेदुखी,खांदेदुखी,नसांशी निगडीत वेदना इत्यादींचा समावेश आहे.या परिषदेचे उद्दिष्ट हे नवीन पिढीला वेदना व्यवस्थापनामध्ये झालेल्या प्रगतीसह सुसज्ज करणे आहे.
ईप्सकॉन 2024 च्या आयोजन समितीच्या सचिव डॉ.वर्षाली केनिया म्हणाल्या की,2005 नंतर पुण्यात या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करणे ही आमच्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.ही परिषद वेदना व्यवस्थापन क्षेत्रातील राष्ट्रीय तज्ञांना एकाच व्यासपीठावर आणून विचारांच्या देवाण-घेवाणासाठी एक उत्कृष्ट संधी आहे.तज्ञांचे मार्गदर्शन,मास्टर क्लासेस,थेट प्रक्षेपित कार्यशाळा,पूर्वसत्रे यामुळे ही परिषद सर्वांसाठी फायदेशीर ठरणार आहे.


