टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत १०,००० हून अधिक चार्जिंग स्‍टेशन्‍स स्‍थापित करण्‍यासाठी आघाडीच्‍या चार्ज पॉइण्‍ट ऑपरेटर्ससोबत सहयोग केला

तारां कित Avatar

13 डिसेंबर २०२३: टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेड (टीपीईएम) या भारतातील ईव्‍ही क्रांतीमधील अग्रणी कंपनीने भारतात चार्जिंग पायाभूत सुविधा अधिक विकसित करण्‍यासाठी आघाडीचे चार्ज पॉइण्‍ट ऑपरेटर्स (सीपीओ) चार्जझोन, ग्लिडा, स्‍टॅटिक आणि झिऑन यांच्‍यासोबत आज सामंजस्‍य करारावर (एमओयू) स्‍वाक्षरी केली. हा सामंजस्‍य करार विशेषत: चार्जिंग इकोसिस्‍टममधील प्रत्‍येक ऑपरेटरची विद्यमान व्‍यापक उपस्थिती आणि भारतातील रस्‍त्‍यांवरील १.१५ लाखांहून अधिक टाटा ईव्‍हींच्‍या आधारावर टीपीईएमच्‍या अद्वितीय टेलिमॅटिक्‍स इनसाइट्सच्‍या आधारे करण्‍यात आला आहे. टीपीईएम चार सीपीओंना त्‍यांचे ईव्‍ही मालक वारंवार येणाऱ्या ठिकाणी चार्जर्स इन्‍स्‍टॉल करण्‍यामध्‍ये आणि ग्राहक अनुभव समजण्‍यास त्‍यामध्‍ये वाढ करण्‍यासाठी चार्जर्स वापरण्‍याच्‍या पद्धतीबाबत माहिती सांगण्‍यामध्‍ये सक्रियपणे साह्य करेल.

चार्जझोन, ग्लिडा (पूर्वीची फोर्टम चार्ज अॅण्‍ड ड्राइव्‍ह इंडिया), स्‍टॅटिक आणि झिऑन देशामधील आघाडीचे सीपीओ आहेत, ज्‍यांचे प्रमुख शहरांमध्‍ये जवळपास २,००० चार्जिंग पॉइण्‍ट्सचे एकत्रित नेटवर्क आहे. या ऑपरेटर्सनी निर्माण केलेली भक्‍कम चार्जिंग इकोसिस्‍टम आधारस्‍तंभ प्रदान करते, ज्‍यावर भारत शाश्‍वत गतीशीलतेच्‍या दिशेने वाटचाल करत आहे. या सहयोगाच्‍या माध्‍यमातून सीपीओंचा पुढील १२ ते १५ महिन्‍यांमध्‍ये १०,००० हून अधिक अतिरिक्‍त चार्जिंग पॉइण्‍ट्स सादर करण्‍याचा मनसुबा आहे.

या सामंजस्‍य कराराच्‍या माध्‍यमातून टीपीईएम चार्जझोन, ग्लिडा, स्‍टॅटिक व झिऑनसोबत सहयोगाने काम करत को-ब्रॅण्‍डेड आरएफआयडी कार्डसद्वारे स्‍मार्ट पेमेंट गेटवे सादर करण्‍याच्‍या शक्‍यतेचा देखील शोध घेईल. यामुळे टाटा ईव्‍ही वापरकर्त्‍यांना सुलभपणे पेमेंट करता येईल. तसेच, ग्राहक या संबंधित सीपीओंच्‍या लॉयल्‍टी प्रोग्राम्‍सच्‍या फायद्यांचा देखील लाभ घेऊ शकतात आणि कोणत्‍याही सहाय्यतेसाठी समर्पित कस्‍टमर केअर क्रमांकाशी संपर्क साधू शकतात.

सामंजस्‍य करारावर स्‍वाक्षरी करताना टाटा मोटर्स पॅसेंजर वेईकल्‍स लि‍मिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ स्‍ट्रॅटेजी ऑफिसर श्री. बालाजे राजन म्‍हणाले, ”शहरातील प्रदूषणाचे निर्मूलन करण्‍यासाठी ईव्‍हीचा अवलंब ही राष्‍ट्रीय गरज आहे आणि सोईस्‍कर चार्जिंग पायाभूत सुविधा ईव्‍ही अवलंबतेला गती देण्‍यासाठी प्रमुख कारक आहे. देशभरात चार्जिंग इकोसिस्‍टमला गती देण्‍यासाठी खुले सहयोग काळाची गरज आहे आणि आम्‍हाला भारताच्‍या ई-मोबिलिटी दिशेने प्रवासाला गती देण्‍यासाठी चार्जझोन, ग्लिडा, स्‍टॅटिक व झिऑन यांच्‍यासोबत आमच्‍या धोरणात्‍मक सहयोगाची घोषणा करताना आनंद होत आहे. या सहयोगामधून टीपीईएमची अद्वितीय ईव्‍ही वापरासंदर्भात माहिती, तसेच सीपीओंचे नाविन्‍यपूर्ण चार्जिंग सोल्‍यूशन्‍स व उद्योजकता उत्‍साहाची माहिती मिळेल आणि आर्थिक वर्ष २०२५ पर्यंत देशभरात १०,००० हून अधिक अतिरिक्‍त चार्जिंग पॉइण्‍ट्स निर्माण होतील.”

जागतिक केस स्‍टडीजमधून व्‍यापक पसरलेल्‍या आणि सुलभपणे उपलब्‍ध होणाऱ्या चार्जिंग पायाभूत सुविधा ईव्‍ही इकोसिस्‍टमसाठी किती महत्त्वाच्‍या आहेत हे दिसून येते. चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या विस्‍तारीकरणामधून ईव्‍हींच्‍या अवलंबतेमध्‍ये मोठी वाढ दिसण्‍यात आली आहे. प्रमुख सीपीओ आणि टीपीईएम यांच्‍यामधील हा नाविन्‍यपूर्ण खुला सहयोग देशातील चार्जिंग पायाभूत सुविधेच्‍या विकासाला गती देण्‍याची अपेक्षा आहे, ज्‍यासाठी ईव्‍ही अवलंबतेत वाढ करण्‍यामध्‍ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे.

स्‍थापनेपासून टीपीईएमने चार्जिंग पायाभूत सुविधा विकसित करण्‍यासाठी टाटा पॉवरसोबत दृढ सहयोग कायम राखला आहे, ज्‍यामुळे देशभरात ४,९०० हून अधिक सार्वजनिक चार्जर्स स्‍थापित झाले आहेत. तसेच, दोन्‍ही कंपन्‍यांनी ईजी चार्ज कार्ड – आरएफआयडी कार्ड देखील लाँच केले, जे ग्राहकांना सुलभपणे चार्जिंग करण्‍याची सुविधा देते. याव्‍यतिरिक्‍त, बीपीसीएलसोबतच्‍या धोरणात्‍मक सहयोगाचा पुढील वर्षभरात ७,००० चार्जर्स उभारण्‍याचा मनसुबा आहे.

Tagged in :

तारां कित Avatar

More Articles & Posts