‘शिवसेवा प्रतिष्ठान’ च्या 2025 च्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी या डायरीच्या यशस्वी वितरणा नंतर शिवसेवा प्रतिष्ठान चे आणखी एक पुढचे पाऊल.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्म त्रिशताब्दी निमित्ताने शिवसेवा प्रतिष्ठान ने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे लघु पुस्तक *पुण्यश्लोक* हे चित्रांसहित तयार केले आहे.
ह्या पुस्तकाचे लेखन सांगलीच्या लेखिका *सौ. विनिता तेलंग* यांनी केले आहे तर हे पुस्तक पुण्यातील *निलकंठ प्रकाशन* ने प्रकाशित केले आहे.
या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ मुंबई दादर येथील राजा शिवाजी विद्यालयाच्या प्रांगणात *श्रीरामनवमीच्या* शुभमुहूर्तावर पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर त्रिशताब्दी कार्यक्रम समिती मुंबई यांच्या कार्यक्रमात रविवार दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी मोठ्या दिमाखात पार पडला.
या पुस्तकाचे प्रकाशन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह मा. *दत्तात्रेय जी होसबळे,* होळकर घराण्याचे वंशज *मा. उदयसिंह होळकर* तसेच मुंबई महानगराचे संघचालक *मा.सुरेशजी बघेरिया* यांचे शुभहस्ते पार पडला.
याप्रसंगी शिवसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष मा. धनंजय चंद्रात्रे तसेच शिवसेवाचे संचालक प्रमोद देशपांडे, राजेश कामठे तसेच अभिजीत चिणे उपस्थित होते.
या कार्यक्रमासाठी विविध क्षेत्रातील 3000 मान्यवर उपस्थित होते.
या पुस्तकाच्या माध्यमातून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचे चरित्र व कार्य महाराष्ट्रातील शाळांमधील विद्यार्थ्यांपर्यंत मोठ्याप्रमाणात पोहोचविण्याचे उद्दिष्ट शिवसेवा प्रतिष्ठान ने ठरविले आहे.


