• निस्सानकडून आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये ९९,०००+ गाड्यांची एकत्रित विक्री (निर्यात + देशांतर्गत) नोंदवली गेली असून आर्थिक वर्ष २०१७-१८ पासून मागील सात वर्षांतील एकाच वर्षांत झालेली ही सर्वाधिक विक्री आहे.
• न्यू निस्सान मॅग्नाइट बी-एसयूव्हीची देशांतर्गत व निर्यात बाजारपेठांमध्ये उत्तम कामगिरी झाल्यामुळे एकत्रित वार्षिक विक्रीत ३५% वाढीची नोंद.
• निस्सानच्या निर्यात व्यवसायात ऐतिहासिक ७१,०००+ गाड्यांची वाढ झाली असून त्याचे प्रमुख कारण ‘वन कार, वन वर्ल्ड’ योजनेअंतर्गत न्यू निस्सान मॅग्नाइट आरएचडी आणि एलएचडी प्रकारांमध्ये मोठी वाढ हे आहे.
• निस्सानने अलीकडेच आर्थिक वर्ष २५ मध्ये ऑल न्यू ७ सीटर बी-एमपीव्ही आणि आर्थिक वर्ष २६ मध्ये ५ सीटर सी-एसयूव्ही आणण्याच्या योजना घोषित केल्या आहेत.
• कंपनी वाढ तसेच नफा यांच्यावर लक्ष केंद्रित करून भारतीय कार्यान्वयनाची पुनर्रचना करत असून जागतिक रचनेचा भाग म्हणून चेन्नई जेव्ही कारखान्यातील समभाग अलायन्स भागीदाराकडे हस्तांतरित करत आहे.
गुरूग्राम, एप्रिल १0, २०२५: निस्सान मोटर इंडिया प्रा. लि. (एनएमआयपीएल)ने भारतात आपली सातत्यपूर्ण आणि शाश्वत वाढ सुरू ठेवली असून मागील सात वर्षांतील सर्वोत्तम कामगिरी आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये केली आहे. देशांतर्गत ऑटो उद्योगासमोर मोठे संकट असतानाही त्यांनी ही कामगिर करून दाखवली आहे. या वर्षी न्यू निस्सान मॅग्नाइटचे यश कायम राहिले. निस्सानच्या देशांतर्गत व्यवसाय योजनेचा हा प्रमुख पाया तर कंपनीच्या जागतिक निर्यात कार्यान्वयनाचा एक महत्त्वाचा घटक ठरला. निस्सान मोटर इंडियाने ऑक्टोबर २०२४ मध्ये आलेल्या न्यू निस्सान मॅग्नाइटच्या २८,००० एकूण देशांतर्गत गाड्यांच्या विक्रीची नोंद आर्थिक वर्ष २०२४-२५ मध्ये केली. भारतात बी-एसयूव्ही विभागात ग्राहक पर्यायी इंधन वाहनांना प्राधान्य देत असतानाही ही उत्तम कामगिरी करणे शक्य झाले आहे.
निर्यातीसंदर्भात बोलायचे झाल्यास कंपनीचे काम २० बाजारपेठांपासून ६५+ आंतरराष्ट्रीय बाजारपेठांपर्यंत वाढले आणि ७१,०००+ गाड्यांची अभूतपूर्व आणि ऐतिहासिक निर्यात विक्री नोंदवली. त्यामुळे जागतिक स्तरावर निस्सानसाठी वाढते उत्पादन आणि निर्यात केंद्र म्हणून भारताची भूमिका आणखी बळकट झाली. यामुळे २०२४-२५ या आर्थिक वर्षात कंपनीची एकत्रित विक्री ९९,०००+ गाड्या झाली आहे.
या कामगिरीबद्दल बोलताना एएमआयईओ रीजन बिझनेस ट्रान्सफॉर्मेशनचे विभागीय उपाध्यक्ष आणि निस्सान इंडिया ऑपरेशन्सचे अध्यक्ष फ्रँक टोरेस म्हणाले की, “निस्सान मॅग्नाइटच्या सातत्यपूर्ण यशामुळे भारत निस्सानसाठी वाढीचा एक मजबूत आधारस्तंभ राहिला आहे. यंदा नवीन निस्सान मॅग्नाइटची निर्यात एलएचडी बाजारपेठांसह ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय भौगोलिक क्षेत्रांमध्ये वाढली आहे.
जागतिक स्तरावरील बदलांचा एक भाग म्हणून भारतातील व्यवसायाच्या पुनर्रचनेबद्दल ते म्हणाले की, “निस्सान भारतीय बाजारपेठ, ग्राहक, वितरक भागीदार, कर्मचारी आणि भागधारकांच्या कल्याणासाठी वचनबद्ध आहे. निस्सान आणि आमचे वितरक भागीदार विद्यमान आणि भविष्यातील नवीन मॉडेल्सच्या ग्राहकांना विक्री आणि सेवा प्रदान करत राहतील. निस्सानची भारतीय उत्पादनातील आक्रमकता कायम आहे. त्यात एक पूर्णपणे नवीन बी-एमपीव्ही आणि दोन नवीन सी-एसयूव्ही आणण्याची योजना आहे. आमच्या वन कार, वन वर्ल्ड योजनेनुसार आम्ही जगभरात वाहने निर्यात करण्याच्या आमच्या योजनांवर काम करत राहू. या पुनर्रचना आमच्या जागतिक स्तरावरील बदलांचा एक भाग असून त्यामुळे कंपनी अधिक शक्तिशाली आणि लवचिक होईल.”
व्यवहार नियामकांच्या मंजुरीच्या सापेक्ष असून एच१ २०२५ च्या अंतापर्यंत पूर्ण होणे अपेक्षित आहे.
निस्सान मोटर इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ वत्स म्हणाले की, “हे वर्ष ऑटो उद्योगासाठी आव्हानात्मक होते. तरीही न्यू मॅग्नाइटने उत्तम कामगिरी करून हे सिद्ध केले आहे की तिला बी-एसयूव्ही ग्राहकांनी पसंत केले आहे. डीलरशिप नेटवर्कचा सतत विस्तार करून सुलभता आणि ग्राहक सेवा सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. आता नवीन ७-सीटर बी-एमपीव्ही आणि ५-सीटर सी-एसयूव्हीच्या घोषणेसह आम्ही एक रोमांचक उत्पादन पोर्टफोलिओ तयार करून आणि ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यसाठी आमची वितरक साखळी वाढवण्यावर लक्ष केंद्रित करत आहोत.”
निस्सान मोटर इंडियाने १ एप्रिल २०२५ पासून सर्व प्रकारांमध्ये नवीन निस्सान मॅग्नाइटच्या किमतीत ३ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. साहित्याचा वाढता खर्च आणि कार्यान्वयन खर्चाची पूर्तता करण्यासाठी ही दरवाढ केली जाईल.


