Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedदिव्यांग व अनाथ मुला-मुलींना सिंबायोसिस ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेसच्या विद्यार्थ्यांकडून मोफत केशकर्तन सेवा

दिव्यांग व अनाथ मुला-मुलींना सिंबायोसिस ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेसच्या विद्यार्थ्यांकडून मोफत केशकर्तन सेवा

पुणे, १० एप्रिल २०२५ – सामाजिक जबाबदारी जोपासत, कौशल्य विकास आणि समाजसेवा यांचा सुरेख समन्वय साधणाऱ्या एका उपक्रमांतर्गत, सिंबायोसिस स्किल्स अ‍ॅण्ड प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या (एसएसपीयु) बीएससी ब्युटी अ‍ॅण्ड वेलनेस अभ्यासक्रमातील विद्यार्थ्यांनी देहूजवळील माई बाल भवन (दिव्यांग व अनाथ मुला-मुलींची संस्था) या स्वयंसेवी संस्थेला भेट दिली.

 

या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी संस्थेतील मुलांना मोफत केस कापण्याची सेवा दिली, ज्यामुळे मुलांसाठी आणि या क्षेत्रातील उदयोन्मुख व्यावसायिकांसाठी एक संस्मरणीय व अर्थपूर्ण अनुभव मिळाला. विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा प्रत्यक्ष जगात उपयोग करता आला आणि त्याचबरोबर सामाजिक जबाबदारी व सहानुभूतीची भावना अधिक दृढ झाली.

 

या प्रसंगी एसएसपीयुच्या संयोगिता गायकवाड म्हणाल्या ” अशा उपक्रमांतर्गत समाजसेवा आणि कौशल्याधारित शिक्षण यांचे महत्त्व विध्यार्थ्यांना कळते. अशा अनुभवांमुळे विद्यार्थी केवळ चांगले व्यावसायिकच नाही तर संवेदनशील नागरिक म्हणूनही घडतात. या प्रकारचे उपक्रम एसएसपीयुच्या सर्वांगीण शिक्षणाप्रती एक उत्कृष्ठ उधारण ठरतात, विद्यार्थ्यांना त्यांच्या कौशल्यांचा विकास करताना समाजासाठी योगदान देण्यास प्रोत्साहित केले जाते. “लर्निंग बाय डुइंग” या विद्यापीठाच्या तत्त्वज्ञानाचेही हे एक उत्तम उदाहरण आहे, जे विद्यार्थ्यांना केवळ उद्योगसिद्ध नव्हे, तर सामाजिकदृष्ट्या जागरूकही बनवते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments