Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedदवाइंडिया ई-फार्मसी आता पुण्यात* * ९० टक्‍क्‍यांपर्यंत मिळणार...

दवाइंडिया ई-फार्मसी आता पुण्यात* * ९० टक्‍क्‍यांपर्यंत मिळणार घरपोच स्‍वस्त औषधे * प्रत्येक घरासाठी परवडणारे आरोग्यसेवेचे नवे पाऊल

 

 

पुणे, १४ एप्रिल २०२५: दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल टाकत भारतातील सर्वात मोठ्या खासगी जेनेरिक औषध विक्रीची साखळी असलेल्‍या ‘दवाइंडिया’ फार्मसी ने पुण्यातही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्म सुरू केला आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे ६० मिनिटांत नागरिकांना घरपोच औषध मिळू शकणार आहे अन्‌ ते देखील ९० टक्‍के स्‍वस्‍त दरांमध्‍ये. दवाइंडियाकडून १४ प्रादेशिक भाषांमध्ये सेवा दिली जाणार आहे, अशी माहिती झोटा हेल्थकेअर लिमिटेड ग्रुपचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ. सुजित पॉल यांनी पुण्‍यात पत्रकार परिषदेत दिली.

 

महाराष्ट्रात ‘दवाइंडिया’चे १०० हून अधिक कंपनीचे स्टोअर्स तर ४० पेक्षा अधिक फ्रँचाईजी स्टोअर्स असून त्‍यापैकी पुण्यात कंपनीचे २८ आणि ११ फ्रँचाईजी स्टोअर्स आहेत. पुण्यातील रास्‍ता पेठ आणि मुंबईतील मिरा रोड येथे २४ तास सेवा देणारी स्टोअर्स चालू आहेत. या उपक्रमाचा केंद्रबिंदू म्हणजे ‘दवाइंडिया’ जेनेरिक फार्मसी अ‍ॅप असून ते भारतातील पहिले १४ प्रादेशिक भाषांमध्ये ऑर्डर करण्यास सक्षम औषध अ‍ॅप देखील आहे.

 

या अ‍ॅपवर २ हजार पेक्षा जास्त उत्पादने उपलब्ध असून ग्राहक औषधांचे ब्रँड, घटक किंवा श्रेणी नुसार शोधू शकतात. त्‍यावर प्रिस्क्रिप्शन अपलोड करू शकतात आणि ६० मिनिटांत घरपोच किंवा १० मिनिटांत स्टोअरवरून पिकअपसाठी ऑर्डर करू शकतात. ‘दवाइंडिया’च्या ऑनलाइन सेवा आता १५ राज्यांतील ६० पेक्षा जास्त शहरांमध्ये उपलब्ध आहेत आणि महाराष्ट्रात ६०० हून अधिक पिनकोड्समध्ये सेवा दिली जात आहे.

 

दवाइंडिया अ‍ॅप, हेल्पलाईन किंवा व्हॉट्सअ‍ॅपवरून सुलभ ऑर्डर करण्‍याव्यतिरिक्त नोंदणीकृत डॉक्टरांचा मोफत सल्ला, औषध रिफिल अलर्ट आणि फार्मासिस्ट कडून मार्गदर्शन अशी अनेक सुविधा देखील देत आहे. तसेच ग्राहकांसाठी खास ऑफर्स आणि रिवॉर्ड्सही दिले जात आहेत.

 

झोटा हेल्थकेअर लिमिटेडचे ग्रुप सीईओ डॉ. सुजित पॉल म्हणाले की, “दवाइंडिया द्वारे आम्ही भारतातील आरोग्यसेवेची संकल्पना नव्याने मांडत आहोत. उच्च दर्जाच्या जेनेरिक औषधांसह तंत्रज्ञान, वेग आणि समावेशकतेचा समावेश करत आम्ही परवडणारी आरोग्यसेवा अधिक लोकांपर्यंत पोहोचवत आहोत.” पुण्यात या संकल्पनेचे अनावरण करणे हे भारताला एक निरोगी देश बनवण्याच्या दिशेने एक पाऊल आहे. भारतातील प्रत्येक कुटुंबाचे उत्पन्न किंवा बोलीभाषा कोणतीही असो, त्यांच्या गरजेवेळी सुरक्षित, प्रभावी आणि परवडणारे उपचार याद्वारे उपलब्ध करून देता येणार आहेत.

 

औषधांच्या वाढत्या मागणीच्या काळात परवडणाऱ्या आरोग्यसेवेच्या वास घेत दावेइंडिया आपल्या अद्वितीय मॉडेल, संपूर्ण रिटेल नेटवर्क आणि “स्वस्थ भारत, समृद्ध भारत” च्या दृष्टिकोनासह आघाडीवर आहे. हे केवळ डिजिटल सुविधा लाँच नाही तर विश्वास, पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा आधार घेत देशभरात परवडणाऱ्या आरोग्यासाठीच्या मोठ्या चळवळीचे हे पहिले पाऊल आहे.

 

दवाइंडिया “स्वस्थ भारत, समृद्ध भारत” या दृष्टिकोनासोबत परवडणाऱ्या आणि विश्वासार्ह आरोग्यसेवेच्या राष्ट्रीय अभियानात आघाडीवर आहे.

 

…………………………….,,….

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments