Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपतित पावन संघटनेतर्फे जोरदार निदर्शने

पतित पावन संघटनेतर्फे जोरदार निदर्शने

 

पुणे _ पतित पावन संघटना खडकवासला विभागाच्या वतीने काल जोरदार निदर्शने केली.प्रथम भारत मातेचे पूजन करण्यात आले.वक्फ कायदा पश्चिम बंगालमध्ये लागू करणार नाही अशी घोषणा करणाऱ्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा जाहीर निषेध करत त्यांचा फोटो या ठिकाणी पेटविण्यात आला. वक्फ दुरूस्ती संशोधन प्रस्ताव लोकसभा व राज्यसभा या ठिकाणी मंजूर झाला.महामहीम राष्ट्रपती यांनी आपला मोहर उमटविला.सदर वक्फ चा कायदा मध्ये रुपांतर झाले.दुर्दैव लोकशाहीत मंजूर झालेला कायदा पश्चिम बंगाल मध्ये लागू करणार नाही अशी घोषणा मुखमंत्री ममता यांनी केली.ही वृत्ती म्हणजे लोकशाहीची थट्टाच म्हणावे लागेल.या घोषणेमुळे हिंदूंचे कत्तल व अतोनात अत्याचार व दंगली सुरू आहेत. शहर अध्यक्ष श्रीकांत शिळीमकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की ममता बॅनर्जी या कायद्या बाबत मुसलमानांची दिशाभूल करीत आहेत. केंद्र सरकारने बंगाल सरकार बरखास्त करुन तेथे ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी केली.कार्यक्रमाचे आयोजन तेजस पाबळे व आशिष बेनकर यांनी केले. या ठिकाणी मनोज नायर, गोकुळ शेलार, सुनील मराठे, राजाभाऊ बर्गे, गणेश जाधव, हराळे पाटील, लक्ष्मी कदम, रेशमा पोकळे, संध्या काळे, रेणुका शेलार,नीलम कडू, विनोद बागल, अण्णा बांगर, शुभम परदेशी, शाहरुख नदाफ, प्रवीण ठाकूर, दीपक परदेशी, अक्षय उंदरे, गणेश साकरे,सचिन सोनवणे, विशाल सूर्यवंशी आदी अनेक जण उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments