पुणे, ता. 18 : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त एकलव्य प्रभात शाखेच्या वतीने वेताळ टेकडी परिसरात ‘प्लॅस्टिक कचरा स्वच्छता अभियान’ आयोजित करण्यात आले होते. या अभियानात 400 किलो कचऱ्याचे संकलन करण्यात आले. कार्यवाह मारुती सरगर, संतोष काळे, श्रीधर अनगळ, रविंद्र दळवी, चेतन भुजबळ, मोरेश्वर सरस्वते, योगेश बाचल यांनी संयोजन केले.


