Thursday, September 10, 2026
Google search engine
HomeUncategorizedपुरुषां"च्या हास्य क्लबमध्ये  " महिला " !

पुरुषां”च्या हास्य क्लबमध्ये  ” महिला ” !

 

 

सानपाडा जेष्ठ नागरिक संघामध्ये नेहमी काही ना काही,नवनवे उपक्रम राबविण्यात येतात. त्यातीलच एक उपक्रम म्हणजे सकाळी ७.०५ चा पुरुषांचा हास्य क्लब. यावेळी काही व्यायाम प्रकार ही करून घेतले जातात. तसेच ज्या सदस्याचा त्या दिवशी वाढदिवस असेल त्याला पुणेरी पगडी घालून, गुलाब पुष्प देऊन, शुभेच्छा दिल्या जातात. वाढदिवसाची गाणी गायल्या जातात. त्यानंतर अल्पोपहार होऊन त्या दिवसाच्या सकाळच्या सत्राची सांगता होत असते. महिन्याच्या शेवटच्या दिवशी होणारा सामुहिक वाढदिवस कार्यक्रम आणि सहली सोडल्यास पुरूष आणि महिलांचे हास्य क्लब,योगासने,गीत संगीत असे अनेक कार्यक्रम मात्र वेगवेगळे आयोजित करण्यात येतात.

 

या परंपरेला छेद देणारा एक अनोखा,पथदर्शी उपक्रम आज

या हास्य क्लबमध्ये आयोजित करण्यात आला,तो म्हणजे क्लबचे सदस्य देवेंद्र भुजबळ यांच्या पत्नी सौ अलका यांना त्यांच्या वाढदिवसानिमित्त हास्य क्लब मध्ये निमंत्रित करण्यात आले.आणि त्यांचा देखील पुरुषांना घालतात तशी पगडी घालून,गुलाब पुष्प देऊन,वाढदिवसाची गाणी गाऊन सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

 

सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे

अध्यक्ष श्री मा ना कदम यांनी प्रारंभी सर्वांचे स्वागत करून कायद्याने जरी स्त्री पुरुषांना समानता दिली असली तरीही अजून प्रत्यक्षात अशी समानता अस्तित्वात येण्याचे महत्व विशद करून त्याचेच पुढील एक पाऊल म्हणजे,आज हास्य क्लब मध्ये

ज्येष्ठ नागरिक संघाच्या सक्रिय सदस्य असलेल्या सौ अलका भुजबळ यांच्या वाढदिवसाचे औचित्य सांगितले.

 

सानपाडा जेष्ठ नागरिक संघाचे

उपाध्यक्ष श्री विठ्ठलराव गव्हाणे यांन अलका ही पुणे जिल्ह्यातील आमच्या घोडेगाव ची मुलगी असल्याचे सांगून तिने जेव्हा आमच्या गावाजवळील सालगाव येथील जनता विद्या मंदिर शाळेतील मुलांना लॉयन्स क्लब तर्फे दफ्तरे वाटली तेव्हा आम्हाला तिचा खूप अभिमान वाटला , असे सांगून तिला दीर्घायुष्य चिंतिले.

 

नागरिक संघाचे खजिनदार

श्री व्हि जी मुखेकर यांनी,मी पोस्ट खात्यात होतो तर अलकाताई टेलिफोन खात्यात होत्या. म्हणजे आम्ही एकाच पी अँड टी खात्यात होतो,असे सांगून त्या आरोग्य विषयक जनजागृती करीत असल्याबद्दल त्यांचे अभिनंदन

करून त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

अनपेक्षितपणे साजरा करण्यात आलेल्या वाढदिवसाने भारावून गेलेल्या, सौ अलका भुजबळ म्हणाल्या की,सकाळच्या या हास्य क्लबमुळे सर्वांचे आरोग्य चांगले राहण्यास मोठाच हातभार लागत आहे. तसेच पती पत्नीने आपण एकमेकांचे स्पर्धक नसून एकमेकांस पूरक आहोत,अशी भूमिका कायम ठेवली तर दोघांबरोबरच सर्व कुटुंबाचा आणि पर्यायाने समाजाचा विकास झपाट्याने होण्यास मदत होईल,असे सांगितले. सकाळ सकाळी साजरा झालेला हा वाढदिवस कायमचा लक्षात राहील,असे सांगून त्यांनी सर्वांचे आभार मानले.

 

शेवटी गायक देवदत्त नागपुरे यांनी वाढदिवसाचे गाणे गाऊन या आनंदमयी कार्यक्रमाची सांगता झाली.कार्यक्रमानंतर अनेक सदस्यांनी व्यक्तिशः भेटून अलकाताईना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments