Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedदागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल - डॉ. सौरभ गाडगीळ

दागिने खरेदीला चांगला प्रतिसाद मिळेल – डॉ. सौरभ गाडगीळ

यावर्षी अक्षय तृतीयेला बाजारात सोन्याचे दर उच्चांकी गाठत असताना देखील सोने खरेदीसाठी ग्राहकांच्या सकारात्मक प्रतिसादासह उत्साह आणि विश्वास दिसून येत आहे. हिंदू पंचांगातील साडे तीन शुभ मुहूर्तांपैकी एक असलेल्या या पवित्र दिवशी, गुंतवणूक म्हणून किंवा खास क्षण साजरे करण्यासाठी सोन्याची खरेदी नक्कीच चांगली असणार असे दिसून येत आहे.

 

यंदा अक्षय तृतीया लग्नसराईच्या सुरुवातीला येत असल्यामुळे, गुढी पाडव्याला बाजारात निर्माण झालेली सकारात्मकता पुन्हा अक्षय तृतीयेच्या निमित्ताने अनुभवता येईल, अशी खात्री आहे. असा विश्वास पु. ना. गाडगीळ ज्वेलर्सचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. सौरभ गाडगीळ यांनी व्यक्त केला. नवीन खरेदी किंवा खास क्षणांना साजरा करण्यासाठी ग्राहकांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल, हे निश्चित!

सोन्याचे दर वाढले असले तरी ग्राहकांच्या आवडींमध्ये एक नवा कल दिसून येत आहे, – स्टडेड ज्वेलरी, खास करून नैसर्गिक हिरे, पोल्की आणि रंगीबेरंगी रत्नांच्या दागिन्यांकडे ग्राहक अधिक आकर्षित होत आहेत. त्याचबरोबर, सोने हे एक सुरक्षित आणि दीर्घकालीन गुंतवणूकीचे साधन असल्याने, सोन्याचे बार व नाण्यांचीही मागणी झपाट्याने वाढेल, असा विश्वास आहे.

आत्तापर्यंतचे सर्व संकेत एक भरभराटीची आणि शुभ अक्षय तृतीया होईल,असे दर्शवत आहेत.”

 

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments