पुणे, दि. 5 : महर्षी कर्वे स्त्रीशिक्षण संस्थेच्या डॉ. भानूबेन नानावटी कॉलेज ऑफ आर्किटेक्चर फॉर वूमेनच्या (बीएनसीए) साक्षी घोडके, राशी आगरवाल आणि केतकी रोकडे या तीन विद्यार्थिनींना बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कारात द्वितीय तर संस्थेच्या सृष्टी कुंभार हिला तृतीय पुरस्काराने नुकतेच गौरवण्यात आले. वास्तूरचनाशास्त्र आणि अभियांत्रिकी क्षेत्रातील ही देशपातळीवरील अत्यंत प्रतिष्ठेची स्पर्धा असून तिचा पुरस्कार वितरण समारंभ नुकताच ‘कन्स्ट्रो २०२४’मधील समारंभात संपन्न झाला.
बीएनसीएच्या वास्तूरचनाशास्त्रातील पदवीपूर्व वर्गात अभ्यास करणाऱ्या साक्षी, राशी आणि केतकी यांनी ‘पश्चिम बंगालमधील सिलीगुडी परीसरातील महानंदा नदीच्या विकासा’बद्दल तर पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या सृष्टीने ‘बांधकाम साहित्याचे जीवनचक्रातील उपयुक्तेचे अर्थिक विश्लेषण’ या विषयांवर सादरीकरण केले. साक्षी, राशी आणि केतकी यांना डॉ. शुभदा कमलापूरकर, प्रा. स्मीता ओगले, प्रा. सुनिता बापट, प्रा. संध्या निवसरकर यांचे, तर पदव्युत्तर वर्गात शिकणाऱ्या सृष्टीला प्रा. सोनाली राजवाडे यांचे मार्गदर्शन लाभले. द्वितीय पुरस्कारात प्रमाणपत्र आणि १५,००० रुपये रोख रक्कमेचा समावेश आहे.
बी. जी. शिर्के विद्यार्थी पुरस्कार स्पधेतील प्रथम पुरस्कार ‘एसएमईएफ’च्या ब्रिक स्कूल ऑफ आर्किटेक्चरमधील राम काळे या विद्यार्थ्याला मिळाला.


