नवीन फंडाची ऑफर 29 एप्रिलपासून सुरु
मुंबई : यूटीआय म्युच्युअल फंडाने यूटीआय मल्टी कॅप फंड लाँच करण्याची घोषणा केली आहे. हा एक ओपन-एंडेड इक्विटी स्कीम असून, मोठ्या, मध्यम आणि लहान बाजार भांडवली कंपन्यांमध्ये गुंतवणूक करतो. “तुमच्या पोर्टफोलिओसाठी मल्टी-व्हिटॅमिन्स” अशी या फंडाची संकल्पना असून, तो एकाच पोर्टफोलिओमध्ये सर्व प्रकारच्या बाजार भांडवली कंपन्यांचे संतुलन साधणारा पर्याय देतो. हा फंड 3S अप्रोच-साइज, सेक्टर्स आणि स्टाईल वापरतो, जो विविध बाजार चक्रांमध्ये टिकून राहण्यासाठी तयार करण्यात आला आहे. नवीन फंडाची ऑफर (NFO) 29 एप्रिल 2025 पासून सुरु होऊन 13 मे 2025 रोजी बंद होणार आहे. किमान ₹1,000 गुंतवणुकीपासून सुरुवात करता येईल आणि त्यानंतर ₹1 च्या पटीत गुंतवणूक करता येईल.
प्रत्येक बाजार भांडवली गटात किमान 25% इतकी शिस्तबद्ध गुंतवणूक राखत, यूटीआय मल्टी कॅप फंड पोर्टफोलिओचे प्रभावी वैविध्यीकरण (diversification) देण्याचा उद्देश ठेवतो.
हा फंड ब्लेंड स्ट्रॅटेजीचा अवलंब करतो, ज्यामध्ये शाश्वत व्यवसाय, मजबूत मूलभूत आर्थिक स्थिती असलेल्या आणि आकर्षक मूल्यांकनावर उपलब्ध कंपन्यांमध्ये, तसेच पुनरुज्जीवनाची शक्यता असलेल्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली जाते.
फंडाचा भर यूटीआय इन्व्हेस्टमेंट कव्हरेज युनिव्हर्समधून आकर्षक वाटणाऱ्या बॉटम-अप स्टॉक्सची ओळख पटविण्यावर असेल.
ही बॉटम-अप निवड प्रक्रिया यूटीआयच्या मालकीच्या स्कोर अल्फा रिसर्च फ्रेमवर्कवर आधारित आहे, जी कंपन्यांचे मूल्यांकन सातत्यपूर्ण ऑपरेटिंग कॅश फ्लो आणि मजबूत रिटर्न रेशोच्या आधारे करते.
या फंडाचा उद्देश आणि वैविध्यीकरणाच्या गरजा लक्षात घेता, मार्केटच्या बदलत्या परिस्थितीनुसार पोर्टफोलिओमध्ये सक्रिय बदल केले जात असल्याने, पोर्टफोलिओ टर्नओव्हर तुलनेत इतर यूटीआय म्युच्युअल फंड रणनीतींपेक्षा जास्त असू शकतो.
ठळक वैशिष्ट्ये:
● फंड व्यवस्थापक: श्री. कार्तिकराज लक्ष्मणन
● बेंचमार्क: उपलब्ध योजना: रेग्युलर आणि डायरेक्ट प्लॅन — फक्त ग्रोथ ऑप्शन
● एग्झिट लोड: गुंतवणूक 90 दिवसांच्या आत रिडीम किंवा स्विच केल्यास 1%; त्यानंतर काहीही शुल्क नाही
यूटीआय मल्टी कॅप फंडाच्या लाँचविषयी बोलताना, यूटीआय एएमसीचे चीफ इन्व्हेस्टमेंट ऑफिसर श्री. वेट्री सुब्रमण्यम म्हणाले : “यूटीआय मल्टी कॅप फंड हा दीर्घकालीन संपत्ती निर्माणास अनुकूल, विचारपूर्वक तयार केलेल्या गुंतवणूक पर्यायांची ऑफर देण्याच्या आमच्या व्यापक उद्दिष्टाचे प्रतिबिंब आहे. हा फंड एक सर्वसमावेशक गुंतवणूक उपाय आहे, जो बाजारातील चक्रांशी जुळवून घेतो. तो आमच्या एकूण अलोकेशन फिलॉसॉफीवर आधारित असून, विविध क्षेत्रांमधील आणि बिझनेस सायकल्समधील आमच्या इक्विटी रिसर्च क्षमतेची सखोलता दाखवितो. रणनीतिक वैविध्यीकरणासह मुख्य इक्विटी पोर्टफोलिओ तयार करू इच्छिणाऱ्या गुंतवणूकदारांसाठी हा एक प्रभावी पर्याय ठरेल, असा आमचा विश्वास आहे.”
श्री. कार्तिकराज लक्ष्मणन, फंड व्यवस्थापक – यूटीआय एएमसी म्हणाले, “यूटीआय मल्टी कॅप फंड गुंतवणूकदारांना भारताच्या इक्विटी बाजारातील संपूर्ण स्पेक्ट्रम एकाच चांगल्या संरचित पोर्टफोलिओद्वारे मिळवून देण्यासाठी तयार करण्यात आला आहे. मोठ्या, मध्यम आणि लहान बाजार कॅप स्टॉक्समध्ये शिस्तबद्ध गुंतवणूक करुन, हा फंड जोखीम आणि परताव्याचे संतुलन साधण्याचा प्रयत्न करतो. विविध बाजार अवस्थांशी जुळवून घेण्यास सक्षम असलेला हा फंड गुणवत्ता असलेल्या व्यवसाय, पुनरुज्जीवित संकल्पना आणि क्षेत्रीय संधींचा संयोग करून दीर्घकालीन उद्दिष्टांना समर्थन देण्यासाठी डिझाइन केला आहे.
यूटीआय मल्टी कॅप फंडच्या लाँचसह, यूटीआय म्युच्युअल फंड त्याच्या इक्विटी ऑफरिंग्सचा विस्तार करतो. भारतामधील सर्वात मोठ्या इक्विटी फंड व्यवस्थापकमध्ये एक, यूटीआय एएमसी ₹1,29,264 कोटींचा व्यवस्थापन करते, ज्यामध्ये 28 सक्रियपणे व्यवस्थापित इक्विटी, हायब्रिड आणि सोल्युशन योजनांचा समावेश आहे. हे दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी विश्वासार्ह भागीदार म्हणून त्याची स्थिती दृढ करते.
प्रॉडक्ट लेवल अँड रिस्कोमीटर
यूटीआय मल्टी कॅप फंड
(एक ओपन-एंडेड इक्विटी योजना, जी मोठ्या, मध्यम आणि लहान कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करते)
● हा फंड पुढील प्रकारच्या गुंतवणूकदारांसाठी योग्य आहे, जे :*
● दीर्घकालीन भांडवली वृद्धीची अपेक्षा करतात.
● मुख्यतः मोठ्या, मध्यम आणि लहान कॅप स्टॉक्समध्ये गुंतवणूक करू इच्छितात.
* गुंतवणूकदारांनी त्यांच्या आर्थिक सल्लागारांचा सल्ला घ्यावा, जर त्यांना हे उत्पादन त्यांच्यासाठी योग्य आहे की नाही, याबाबत शंका असेल.


