Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedपीआयबीएम येथे आयोजित राष्ट्रीय एमएसएमई समिट व लीडरशीप कॉन्क्लेव्ह ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पीआयबीएम येथे आयोजित राष्ट्रीय एमएसएमई समिट व लीडरशीप कॉन्क्लेव्ह ला उत्स्फूर्त प्रतिसाद

पुणे,30 एप्रिल 2025 : पुणे इन्स्टिट्युट ऑफ बिझनेस मॅनेजमेंट (पीआयबीएम),पिरंगुट येथे आयोजित देशातील सूक्ष्म,लघु आणि मध्यम उद्योगांसाठी (एमएसएमई) समर्पित उद्दीपन 2025 या परिषदेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

पीआयबीएम आणि एआयसीटीई यांच्या संयुक्त विद्यमाने ही परिषद आयोजित करण्यात आली होती. या महत्त्वपूर्ण परिषदेत देशभरातील एमएसएमई क्षेत्रातील नोकरीच्या संधी जाणून घेण्यासाठी नॉलेज पार्टनर असलेल्या पीआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसह रमणबाईट प्रा.लि.यांनी तयार केलेले उद्दीपन हे मोबाईल ॲप्लिकेशन सादर करण्यात आले. एमएसएमई क्षेत्रातील रोजगाराचा चेहरा बदलण्यासाठी सज्ज असलेले हे पोर्टल रमणबाईट प्रा.लि.ने एआयसीटीईच्या सहकार्याने सुरू केले आहे.

एमएसएमई क्षेत्राला अधिक सक्षम आणि प्रगतशील करण्यासाठी डिझाईन करण्यात आलेले उद्दीपन ॲपमुळे परिषदेत उद्योग क्षेत्रातील नेतृत्व,धोरणकर्ते,गुंतवणूकदार आणि सरकारी अधिकारी यांच्या मार्गदर्शनासह सहकार्य,नवोन्मेष आणि विकासासाठी एक गतिमान व्यासपीठ निर्माण झाले.

उद्दिपन या एमएसएमई परिषदेला अनेक मान्यवरांची उपस्थिती होती. प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय शिक्षण व विकास राज्यमंत्री (उत्तरपूर्व) श्री.सुकांता मजूमदार, महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री श्री.उदय सामंत यांसह सन्माननीय अतिथी म्हणून एआयसीटीईचे अध्यक्ष प्रा.डॉ.टीजी सीथाराम, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष इक्बाल सिंग लालपुरा, तसेच पुण्याचे सीजीएसटी ऑडिट 1,कमिश्नरेट अतिरिक्त आयुक्त जस्मीत सिंग धांद्रा आणि कौशल्य विकास,रोजगार आणि उद्योजकता आयुक्त आणि महाराष्ट्र स्टेट स्कील डेव्हलपमेंट विकास सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन पाटील, भोर विधानसभा मतदार संघाचे आमदार शंकर मांडेकर,महाराष्ट्र सरकारच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव बी.वेणूगोपाळ रेड्डी आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.पराग काळकर आदी मान्यवर उपस्थित होते.

पीआयबीएम ग्रुप ऑफ इन्स्टिट्युटसचे अध्यक्ष रमणप्रीत सिंग यांनी स्वागतपर भाषण केले.
या दोन दिवसीय परिषदेत 2000 हून अधिक प्रतिनिधी आणि 160 हून अधिक एमएसएमई प्रदर्शकांची उपस्थिती होती. यामध्ये,तरूण नवोन्मेषक आणि उद्योजकांसाठी विविध उपक्रमांचा समावेश होता. यामध्ये मार्गदर्शन सत्रे,अभिनवता आणि व्यवसाय विस्ताराला प्रोत्साहन देण्यासाठी एमएसएमई प्रदर्शन,उद्योगातील नेतृत्व,धोरणकर्ते यांच्यासोबत संवाद त्याचबरोबर भांडवल,ऑटोमेशन सोल्युशन्स,आयपीओ सहाय्य आणि गुंतवणूकदारांशी संपर्क साधण्याच्या उद्देशाने आयोजित विशेष सत्रांचा समावेश होता. याशिवाय इच्छुक तरूणांना एमएसएमई क्षेत्रांशी जोडण्यासाठी व रोजगाराची संधी निर्माण करण्यासाठी एक विशेष टॅलेंट मॅचमेकिंग डेक देखील स्थापित करण्यात आला होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments