Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुर्लभ कला प्रकारांचे 'अर्पण' चित्रकला प्रदर्शन आजपासून (दि.१ मे) दादरकर आर्ट...

दुर्लभ कला प्रकारांचे ‘अर्पण’ चित्रकला प्रदर्शन आजपासून (दि.१ मे) दादरकर आर्ट स्टुडिओच्या वतीने राजश्री दादरकर यांचे कला प्रदर्शन

पुणे: टेराकोटा, मोज़ॅईक आणि स्टेन ग्लास या दुर्लभ होत चाललेल्या कला प्रकारांचे दर्शन घडविणारे अर्पण कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. संजय दादरकर यांच्या स्मरणार्थ राजश्री दादरकर यांच्या कला प्रदर्शनाचे आयोजन दिनांक १ ते ४ मे दरम्यान मॉडेल कॉलनीतील रवी परांजपे स्टुडिओ मध्ये करण्यात आले आहे.

प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट हरी आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. दिनांक ४ मे पर्यंत दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे.

राजश्री दादरकर म्हणाल्या, या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० ते २५० कलाकृतींचा समावेश असून त्यात टेराकोटा वॉल फ्रेम्स, स्टेन ग्लास डिझाईन आणि मोज़ॅईक वर्कचे विविध नमुने पाहायला मिळणार आहेत. विशेष म्हणजे, या प्रदर्शनात “डीआयवाय टेराकोटा किट” ही नाविन्यपूर्ण संकल्पनाही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात येणार आहे. या किटद्वारे प्रेक्षक स्वतः टेराकोटाचे डिझाईन बनवण्याचा अनुभव घेऊ शकतील.

राजश्री आणि संजय दादरकर यांची कला यात्रा १९७८ साली अभिनव कला महाविद्यालयातून सुरू झाली. संजय दादरकर यांनी पॉटरी आणि सिरॅमिक्समध्ये प्रशिक्षण घेऊन पुण्यात १९८० मध्ये स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. भद्रावती येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यांनी कुंभारकाम, टेराकोटा दिवे, सिरॅमिक्स म्युरल्स आणि स्टेन ग्लास यामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कार्याची ठसा आजही बालगंधर्व रंगमंदिर आणि सारसबागेतील सावरकर टाइल पेंटिंगमधून पाहायला मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments