मुंबई, 30 एप्रिल 2025: JSW समूहाचा एक भाग असलेल्या आणि भारतातील दुसऱ्या क्रमांकाची खाजगी व्यापारी बंदर ऑपरेटर JSW इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड (“कंपनी”) ने आज 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या चौथ्या तिमाही व आर्थिक वर्षासाठीचे निकाल जाहीर केले.
आर्थिक वर्ष 2025 ची चौथी तिमाही – मुख्य ठळक बाबी
· 31.2 दशलक्ष टन माल कार्गो हँडलिंग – वार्षिक 5% वाढ
· एकूण महसूल वार्षिक 14% वाढीने 1,372 कोटी रु.
· वार्षिक 7% वाढीने EBITDA 730 कोटी रु.
· वार्षिक 57% वाढीने कर पश्चात नफा (PAT) 516 कोटी रु.
आर्थिक वर्ष 2025 मुख्य ठळक बाबी
· 117 दशलक्ष टन माल कार्गो हँडलिंग – वार्षिक 9% वाढ
· थर्ड पार्टी हिस्सा गेल्या वर्षीच्या 40% वरून 49% पर्यंत वाढला
· एकूण महसूल वार्षिक 20% ने वाढून 4,829 कोटी रु.
· EBITDA वार्षिक 17% वाढून 2,615 कोटी रु
· PAT वार्षिक 31% वाढून 1,521 कोटी रु.
· संचालक मंडळाने 0.80 रु.प्रति शेअर लाभांशाची शिफारस केली असून तो भागधारकांच्या मंजुरीवर अधीन असेल
· मजबूत ताळेबंद
· नेट डेब्ट / ऑपरेटिंग EBITDA 0.65 पट
· ग्रॉस डेब्ट 4,659 कोटी रु. आणि रोख व बँक शिल्लक 3,188 कोटी रु.
आर्थिक वर्ष 2025 – महत्त्वाच्या घडामोडी
· महाराष्ट्र राज्यातील एक हरितक्षेत्र पोर्ट असलेल्या मुरबे पोर्टसाठी Letter of Intent (LOI) प्राप्त झाला आहे
· Navkar Corporation Limited मध्ये 70.37% हिस्सा मिळवून लॉजिस्टिक क्षेत्रात पदार्पण
· JNPA लिक्विड टर्मिनल व तूतीकोरिन टर्मिनल येथे सवलत करारावर स्वाक्षरीनंतर अंतरिम कामकाजाला सुरुवात
· Slurry Pipeline व्यवसायाचे अधिग्रहण पूर्ण झाले आणि JSW Steel Ltd सोबत दीर्घकालीन टेक ऑर पे करार करण्यात आला
· कंपनीचे प्रमुख पोर्ट असलेल्या जयगड पोर्टला ब्रिटिश सेफ्टी कौन्सिल कडून “स्वोर्ड ऑफ ऑनर” पुरस्कार मिळाला
एकत्रित आर्थिक कामगिरी
आर्थिक वर्ष 2025 ची चौथी तिमाही
या तिमाहीत कंपनीने 31.2 दशलक्ष टन मालाचे कार्गो हँडलिंग केले. मागील वर्षाच्या तुलनेत हे प्रमाण 5% अधिक होते.
या वाढीचे प्रमुख कारण मंगळूर, एन्नोर व पारादीपमधील कोळसा टर्मिनल्सची मजबूत कामगिरी तसेच तूतीकोरिन टर्मिनल व JNPA लिक्विड टर्मिनल येथील अंतरिम कामकाजाचे योगदान होते. मात्र, पारादीप येथील लोखंड धातू टर्मिनलमधील मालवाहतूक घटल्यामुळे काही प्रमाणात ही वाढ मर्यादित झाली.
थर्ड पार्टी कडून होणाऱ्या मालवाहतुकीत वार्षिक 11% वाढ झाली असून, थर्ड पार्टीचा एकूण वाटा 50% झाला आहे. तो गेल्या वर्षी 47% होता.
वाढलेली मालवाहतूक आणि Navkar Corp चा व्यवसाय एकत्रित केल्यामुळे एकूण महसूल 1,372 कोटी रु.वर पोहोचला असून त्यात वार्षिक 14% वाढ झाली. EBITDA 730 कोटी रु. झाला (वार्षिक 7% वाढ) आणि 53.2% एवढे मजबूत मार्जिन नोंदवले गेले. परिणामी PAT 516 कोटी रु. वर पोहोचला असून त्यात 57% वाढ झाली.
आर्थिक वर्ष 2025
वर्षभरात कंपनीने 117 दशलक्ष टन कार्गो मालाचे हँडलिंग केले. ते मागील वर्षाच्या तुलनेत 9% अधिक आहे. ही वाढ मुख्यतः नव्याने अधिग्रहित केलेल्या मालमत्तांमधून (Fujairah Liquid Terminal आणि PNP Port) आलेल्या अतिरिक्त मालवाहतूकीमुळे आणि पारादीप, एन्नोरे व मंगळूर येथील कोळसा टर्मिनल्समधील क्षमतेचा जास्तीत जास्त वापर यामुळे झाली आहे.
थर्ड पार्टीच्या मालवाहतुकीत 57.3 दशलक्ष टनांची नोंद झाली असून त्यात वार्षिक 34% वाढ झाली आहे. त्यामुळे, थर्ड पार्टीचा एकूण मालवाहतुकीतील वाटा गेल्या वर्षीच्या 40% वरून वाढून 49% झाला आहे.
या वाढलेल्या मालवाहतुकीमुळे, 11 ऑक्टोबर 2024 पासून Navkar Corp चा समावेश करून, एकूण महसूल 4,829 कोटी रु. झाला असून त्यात वार्षिक 20% वाढ झाली. वाढलेला महसूल, कामकाज लाभ व खर्च नियंत्रण यामुळे EBITDA 2,615 कोटी रु. झाला (वार्षिक 17% वाढ) आणि मार्जिन 54.2% राहिले. याचा परिणाम म्हणून PBT मध्ये 23% वाढ होऊन तो 1,803 कोटी रु. झाला तर PAT 1,521 कोटी रु. झाला. त्यात वार्षिक 31% वाढ नोंदवली गेली.
वाढीचे धोरण
पूर्वी जाहीर केल्याप्रमाणे कंपनीने आर्थिक वर्ष 2030 किंवा त्यापूर्वी 400 दशलक्ष टन वार्षिक मालवाहतूक क्षमतेपर्यंत पोहोचण्याच्या विकास योजनेवर काम सुरू केले आहे. सध्या ही क्षमता 177 दशलक्ष टन वार्षिक एवढी आहे. हे साध्य करण्यासाठी 30,000 कोटी रु. च्या समग्र भांडवली खर्च (capex) योजनेचे नियोजन करण्यात आले आहे.
जोडीला कंपनीने लॉजिस्टिक्स क्षेत्राच्या विस्तारासाठी 9,000 कोटी रु.ची तरतूद केली आहे. हा विस्तार नवकार अधिग्रहणाच्या आधारे अखिल भारतीय लॉजिस्टिक नेटवर्क उभारण्याच्या उद्देशाने केला जात आहे. कंपनीचा उद्देश लॉजिस्टिक विभागासाठी 8,000 कोटी रु.च्या टॉपलाईनसह 25% EBITDA मार्जिन राखणे असून, उद्योगात सर्वोत्तम Return on Capital Employed (ROCE) साध्य करणे आहे.
मजबूत ताळेबंद याच्या जोरावर कंपनी ऑर्गनिक आणि इनऑर्गनिक अशा दोन्ही वाढीच्या संधींचा पाठपुरावा करण्यासाठी सक्षम असून यासाठी लीव्हरेज रेशोवर कोणताही विपरीत परिणाम होणार नाही.
About JSW Infrastructure Limited:


