गुरूग्राम, भारत – मे १, २०२५: सॅमसंग या भारतातील सर्वात मोठ्या ग्राहक इलेक्ट्रॉनिक्स ब्रँडने एआय-पॉवर्ड क्यूएलईडी टीव्ही आणि क्रिस्टल क्लीअर ४के यूएचडी टीव्हीच्या नवीन श्रेणीच्या लाँचची घोषणा केली आहे, जी १ मे २०२५ पासून अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि Samsung.com वर उपलब्ध असेल. अल्टिमेट होम एंटरटेन्मेंट अनुभव देण्यासाठी डिझाइन करण्यात आलेल्या नवीन लाइनअपमध्ये अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानासह सुसज्ज क्यूएलईडी सिरीज – यूई८१ आणि सर्वोत्तम व्युइंग अनुभवासाठी अपवादात्मक क्लेरिटी, कलर व तपशील देण्याकरिता डिझाइन करण्यात आलेली क्लीअर ४के यूएचडी सिरीज – यूई८१, यूई८४, यूई८६ चा समावेश आहे.
या लाँचची खासियत आहे क्यूएलईडी टीव्ही, ज्यामध्ये रिअल व सेफ क्वॉन्टम डॉट टेक्नॉलॉजी आहे, जी आकर्षक कलीर अचूकता व टिकाऊपणा देते. अद्वितीय कलर अचूकतेसाठी ट्रू क्वॉन्टम डॉट्स असलेल्या या टेलिव्हिजन्स कर्करोग होण्यास कारणीभूत घातक घटक कॅडमियमपासून मुक्त आहेत, ज्यामधून सुरक्षितता आणि उच्च दर्जाच्या कार्यक्षमतेची खात्री मिळते.
सॅमसंगच्या आधुनिक क्यू४ एआय प्रोसेसरची शक्ती असलेला टीव्ही शार्पर व्हिज्युअल्स, सुस्पष्ट साऊंड आणि अधिक वैयक्तिकृत व्युइंग अनुभवासह रिअल-टाइममध्ये कन्टेन्टचे विश्लेषण व ऑप्टिमाइज करतो. सॅमसंग व्हिजन एआयचा फायदा घेत हा टीव्ही पिक्चर क्वॉलिटी इंटेलिजण्टली वाढवतो, जेथे वास्तविक अनुभवासाठी सीन्स, वस्तू व चेहऱ्यांना ओळखतो, तसेच अधिक वास्तविक रंगसंगतींसाठी पॅन्टोन व्हॅलिडेटेड कलर्ससह अचूक कलर आकारमानाची खात्री देतो. समाधानाच्या खात्रीसाठी या टीव्हीमध्ये सॅमसंग नॉक्स सिक्युरिटीचे संरक्षण आहे, जे वापरकर्त्यांचा डेटा व कनेक्टेड डिवाईसेसचे संरक्षण करते. तसेच, नवीन लाइनअप एण्डलेस फ्री कन्टेन्ट देते, ज्यामधून विना अतिरिक्त खर्चामध्ये मनोरंजनाचा आनंद मिळतो.
सॅमसंगचे नवीन यूएचडी मॉडेल्स प्रगत क्रिस्टल ४के प्रोसेसरच्या माध्यमातून क्रिस्टल-क्लीअर ४के रिझॉल्यूशन देतात, ज्यामधून शार्प व वैविध्यपूर्ण व्हिज्युअल्सची खात्री मिळते. ४के अपस्केलिंगसह मॉडेल्स कमी रिझॉल्यूशन कन्टेन्टला जवळपास ४के क्वॉलिटीमध्ये बदलतात. प्युरकलर असलेले हे मॉडेल्स वास्तविक सर्वोत्तम व्युइंग अनुभवासाठी वास्तविक रंगसंगती देतात. एकीकृत ओटीएस लाइट तंत्रज्ञान व्हर्च्युअल टॉप चॅनेल ऑडिओसह डायनॅमिक साऊंड देतात, ज्यामधून संपन्न ऑडिओ अनुभव मिळतो. अनेक मोफत कन्टेन्ट उपलब्ध करून देण्यासह हे मॉडेल्स अधिकाधिक प्रेक्षकांना प्रीमियम मनोरंजनाचा आनंद देतात.
सॅमसंग इंडियाच्या व्हिज्युअल डिस्प्ले बिझनेसचे वरिष्ठ संचालक विप्लेश डांग म्हणाले, “सॅमसंगमध्ये आम्ही होम एंटरटेन्मेंटला नव्या उंचीवर घेऊन जाणारी उत्पादने वितरित करण्यासाठी सतत नाविन्यतांच्या मर्यादांना दूर करत आहोत. आमच्या एआय-एन्हान्स्ड क्यूएलईडी आणि क्रिस्टल क्लीअर ४के यूएचडी टेलिव्हिजन्सच्या लाँचसह आम्ही ग्राहकांसाठी व्युइंग अनुभव उत्साहित करत आहोत, प्रगत मनोरंजनाचा आनंद देत आहोत. सॅमसंग व्हिजन एआयची शक्ती असलेले हे मॉडेल्स सुधारित पिक्चर क्वॉलिटीसाठी इंटेलिजण्ट सीन रेकग्निशन देतात, ज्यामुळे प्रत्येक फ्रेम अधिक सर्वोत्तम बनते; या लाँचमधून अधिकाधिक कुटुंबांना इंटेलिजण्ट व्युइंग अनुभव देण्याप्रती, तसेच नाविन्यता, सोयीसुविधा आणि विश्वसनीयतेसह ग्राहकांच्या सर्वसमावेशक गरजांची पूर्तता करण्याप्रती आमची समर्पितता दिसून येते;”
ग्राहक जवळपास ३५ टक्क्यांपर्यंत सूट अशा फायद्यांचा आनंद घेऊ शकतात. नवीन सॅमसंग ऑनलाइन टीव्ही लाइनअप क्यूएलईडी मॉडेल्ससाठी प्रतिमहिना ३,३३३ रूपये आणि यूएचडी मॉडेल्ससाठी प्रतिमहिना २,५०० रूपये इतक्या १२ महिन्यांच्या नो कॉस्ट ईएमआयसह उपलब्ध आहे. ग्राहक जवळपास ३,००० रूपयांच्या त्वरित बँक कॅशबॅकचा देखील लाभ घेऊ शकतात. नाविन्यपूर्ण वैशिष्ट्ये आणि विशेष लाँच ऑफर्ससह ही नवीन श्रेणी लिव्हिंग स्पेसेसना सिनेमॅटिक हब्समध्ये बदलण्यास सज्ज आहे.
क्यूएलईडी टीव्हीची प्रमुख वैशिष्ट्ये रिअल आणि सेफ क्यूएलईडी
सॅमसंगच्या रिअल आणि सेफ क्यूएलईडी टेलिव्हिजन्स १०० टक्के कलर व्हॉल्यूम-सर्टिफाईड क्वॉन्टम डॉट तंत्रज्ञानासह डिझाइन करण्यात आल्या आहेत, ज्या वैविध्यपूर्ण वास्तविक व्हिज्युअल्स देतात. विश्वसनीय जागतिक संस्थांनी सुरक्षिततेसाठी प्रमाणित केलेले हे टेलिव्हिजन्स कर्करोग होण्यासाठी कारणीभूत असलेला घातक घटक कॅडमियमपासून मुक्त आहे, ज्यामधून सर्वांसाठी आरोग्यदायी व चिंतामुक्त व्युइंग अनुभव मिळतो. ४ एआय प्रोसेसर
सॅमसंग क्यू४ एआय प्रोसेसर रिअल टाइममध्ये व्हिज्युअल्स व साऊंड इंटेलिजण्टली ऑप्टिमाइज करत टीव्ही व्युइंग अनुभव उत्साहित करते. हे प्रोसेसर कन्टेन्टला सविस्तर ४के रिझॉल्यूशनपर्यंत वाढवते, ज्यामधून आसपासची स्थिती आणि पाहिले जाणाऱ्या कन्टेन्टनुसार सर्वोत्तम अनुभव मिळतो. पॅन्टोन व्हॅलिडेशन
पॅन्टोन व्हॅलिडेशन पॅन्टोनच्या प्रखर चाचणी मानकांची पूर्तता करत उच्च दर्जाच्या कलर अचूकतेची खात्री देते. या प्रमाणनामधून पॅन्टोन कलर्स व स्किन टोन्सच्या वास्तविक निर्मितीची खात्री मिळते, ज्यामधून सर्वोत्तम व्युइंग अनुभव मिळतो, जो क्रिएटरच्या मूळ दृष्टिकोनाशी संलग्न असतो. सॅमसंग व्हिजन एआय
सॅमसंग व्हिजन एआय रिअल-टाइम एआय अपस्केलिंग, स्मार्ट वैशिष्ट्ये, जसे जनरेटिव्ह वॉलपेपर आणि स्मार्टथिंग्ज यांसह टेलिव्हिजन्समध्ये इंटेलिजण्ट सुधारणांची भर करते. ते वातावरण आणि युजर गरजांनुसार व्हिज्युअल्स, साऊंड आणि इंटरअॅक्शन्सशी जुळून जाते. अॅडवान्स्ड एआय क्षमता अत्यंत वैयक्तिकृत व सर्वोत्तम व्युइंग अनुभव देतात.सॅमसंग नॉक्स सिक्युरिटी
सॅमसंग नॉक्स सुरक्षिततेप्रती सॅमसंगची कटिबद्धता आहे, जे डिवाईसेसमध्ये डिफेन्स-ग्रेड प्रोटेक्शन देते. हे वैशिष्ट्य सुरक्षितता वैशिष्ट्यांची सर्वसमावेशक श्रेणी देते, जे विविध व्यवसाय गरजांची पूर्तता करण्यासाठी कस्टमाइज करण्यात आले आहेत. नॉक्ससह व्यवसाय आत्मविश्वासाने त्यांचा डेटा व ऑपरेशन्सचे संरक्षण करू शकतात. स्मार्टथिंग्ज
सॅमसंग टेलिव्हिजन्सवरील स्मार्टथिंग्ज अॅप टेलिव्हिजन आणि इतर स्मार्ट डिवाईसेस नियंत्रित आणि ऑटोमेट करण्याची सुविधा देते, ज्यामुळे घरातील मनोरंजनाचा अनुभव अधिक उत्साहित होतो. स्मार्टथिंग्जचा वापर करत तुम्ही अप्लायन्सेस, लाइट्स आणि सिक्युरिटी कॅमेऱ्यांवर प्रत्यक्ष टीव्हीमधून नियंत्रण ठेवू शकता. यासाठी टीव्हीच्या मेनूमधील स्मार्टथिंग्ज पर्याय नेव्हिगेट करा आणि डिवाईसेसना कनेक्ट करण्यासाठी सूचनांचे पालन करा.
क्रिस्टल प्रोसेसर ४के अचूक कलर मॅपिंगसह सुधारित पिक्चर क्वॉलिटी देते. या शक्तिशाली प्रोसेसरमधून खात्री मिळते की प्रत्येक रंगछटा इच्छित अपेक्षेप्रमाणे दिसते, ज्यामधून सर्व कन्टेन्टसाठी वास्तविक ४के रिझॉल्यूशन मिळते.
प्युरकलरसह ग्राहक त्याचा आवडता कन्टेन्ट पाहण्याचा, तसेच स्क्रिनवर वास्तविक कलर एक्स्प्रेशनचा आनंद घेऊ शकतात. या वैशिष्ट्यासह टेलिव्हिजन सानुकूल पिक्चर परफॉर्मन्स आणि सर्वोत्तम व्युइंग अनुभवासाठी व्यापक रंगसंगती सादर करतो. वन बिलियन ट्रू कलर्ससह हे विशिष्ट तंत्रज्ञान टीव्ही स्क्रिनवरील कन्टेन्ट वास्तविक घडत असल्याचा भास देते, जेथे विद्यमान रंगसंगतींना त्यांच्या मूळ स्थितीत दाखवले जाते.
ग्राहक त्याचे आवडते वॉईस असिस्टण्ट निवडू शकतात, जे त्यांच्या कनेक्टेड होममध्ये प्रगत कंट्रोलसाठी नवीन क्रिस्टल व्हिजन ४के यूएचडी टीव्हीमध्ये बिल्ट-इन आहे. ते बिक्स्बी किंवा अॅमेझॉन अॅलेक्सामधून निवड करू शकतात आणि त्यांच्या लिव्हिंग रूममध्ये आराममात होम एंटरटेन्मेंटचा आनंद घेऊ शकतात. ओटीएस लाइट
ओटीएस लाइट (ऑब्जेक्ट ट्रॅकिंग साऊंड लाइट) ऑन-स्क्रिन मूव्हमेंट्स ओळखण्यासाठी आणि मल्टी-चॅनेल स्पीकर्सचा वापर करत अचूकपणे साऊंड देण्यासाठी सॅमसंगच्या एआय अल्गोरिदम्सचा वापर करते. ३डी सराऊंड साऊंडसह आमचे व्हर्च्युअल टॉप चॅनेल सर्वोत्तम ऑडिओ अनुभव देते.


