Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorized*'अर्पण' कला प्रदर्शनात टेराकोटा, मोझाईक मधील दुर्मिळ कलाकृती साकार* दादरकर...

*’अर्पण’ कला प्रदर्शनात टेराकोटा, मोझाईक मधील दुर्मिळ कलाकृती साकार* दादरकर आर्ट स्टुडिओ च्या वतीने राजश्री दादरकर यांचे कला प्रदर्शन

पुणे: टेराकोटा, मोझाईक आणि स्टेन्ड ग्लास या कलाप्रकारातील विविध कलाकृती पाहण्याची संधी पुणेकरांना ‘अर्पण’ कला प्रदर्शनातून मिळाली. दुर्लभ होत चाललेल्या कला प्रकारांना उजाळा देण्याचे काम राजश्री दादरकर यांनी प्रदर्शनाच्या माध्यमातून केले आहे. या कलाकृतींमध्ये पारंपरिक तंत्र आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा समन्वय साकारण्यात आला आहे.

संजय दादरकर यांच्या स्मरणार्थ राजश्री दादरकर यांच्या कला प्रदर्शनाचे उद्घाटन आर्किटेक्ट हरी आगाशे यांच्या हस्ते झाले. दिनांक ४ मे पर्यंत मॉडेल कॉलनीतील रवी परांजपे स्टुडिओमध्ये दररोज सकाळी ११ ते संध्याकाळी ७ या वेळेत विनामूल्य प्रदर्शन पाहता येणार आहे.

या प्रदर्शनामध्ये सुमारे २०० ते २५० कलाकृतींचा समावेश असून त्यात टेराकोटा वॉल फ्रेम्स, स्टेन्ड ग्लास डिझाईन आणि मोझाईक वर्कचे विविध नमुने आहेत. टेराकोटा शिल्पांमध्ये पारंपरिक भारतीय जीवनशैलीचे प्रतिबिंब तर मोझाईक कलाकृतींमध्ये रंगीबेरंगी काच आणि टेराकोटाचे तुकडे यांचा वापर करून विविध आकृती आणि दृश्ये साकारण्यात आली आहेत.
विशेष म्हणजे, या प्रदर्शनात “डीआयवाय टेराकोटा किट” ही नाविन्यपूर्ण संकल्पनाही प्रेक्षकांसमोर सादर करण्यात आली असून या किटद्वारे प्रेक्षक स्वतः टेराकोटाचे डिझाईन बनवण्याचा अनुभव घेऊ शकतील.

राजश्री आणि संजय दादरकर यांची कला यात्रा १९७८ साली अभिनव कला महाविद्यालयातून सुरू झाली. संजय दादरकर यांनी पॉटरी आणि सिरॅमिक्समध्ये प्रशिक्षण घेऊन पुण्यात १९८० मध्ये स्वतःचा स्टुडिओ सुरू केला. भद्रावती येथील कृष्णमूर्ती मिरमिरा यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यांनी कुंभारकाम, टेराकोटा दिवे, सिरॅमिक्स म्युरल्स आणि स्टेन ग्लास यामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. त्यांच्या कार्याची ठसा आजही बालगंधर्व रंगमंदिर आणि सारसबागेतील सावरकर टाइल पेंटिंग मधून पाहायला मिळतो.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments