Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने जुळले दृष्टीहिन जोडप्यांचे 'सुस्वर'* *शुक्रवार पेठेतील सेवा मित्र...

गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने जुळले दृष्टीहिन जोडप्यांचे ‘सुस्वर’* *शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा

पुणे : सनईचे मंगलमय सूर…कार्यकर्त्यांची सुरु असलेली लगबग….वाजत गाजत काढलेली वरात…भांड्यांपासून कपाट आणि सोफ्यापर्यंत विविध वस्तूंनी सजलेले रुखवत… वाद्यांचा गजर आणि वैदीक मंत्रोच्चाराचे सूर अशा मंगलमय वातावरणात गायिका असणारी शितल केंद्रे आणि सुनील पवार या दृष्टीहिन जोडप्याचा विवाह सोहळा संपन्न झाला. गणेशोत्सव कार्यकर्त्यांच्या साक्षीने शितल आणि सुनील यांनी प्रेमाची व नव्या स्वप्नाची गाठ बांधली.

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ ट्रस्टतर्फे या अनोख्या विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार हेमंत रासने, सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत पाठक, कर्नल भार्गव, किशोर सरपोतदार, सुभाष सरपाले, मंडळाचे अध्यक्ष पराग शिंदे, अमर लांडे, सचिन ससाणे, रोहिणी चेन्नूर, सुनेत्रा राचेल्ला यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, विविध गणेशोत्सव मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

शितल केंद्रे ही मूळची नांदेडची तर सुनील पवार हा संगमनेरचा आहे. दोघेही वाघोलीच्या लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेत असतात. शितल ही संस्थेच्या ऑर्केस्ट्रा मध्ये गायिका असून दोघेही स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत. विवाह सोहळ्यात साखरपुडा, हळदी समारंभ विवाहाचे धार्मिक विधी पार पडले. लुई ब्रेल अंध अपंग कल्याण संस्थेच्या सहयोगाने दरवर्षी या अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे.

गणेशोत्सव मंडळातील पदाधिका-यांनी आणि कार्यकर्त्यांनी या मुलींचे मामा म्हणून कन्यादान केले. मेहेंदी, साखरपुडा, हळदी समारंभ अशा सगळ्या कार्यक्रमात आजूबाजूच्या परिसरातील महिलांनी मोठया उत्साहाने सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments