Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedअविवा लाइफ इन्शुरन्सचा सलग सातव्या वर्षी ‘भारतातील सर्वांत विश्वासार्ह प्रायव्हेट लाइफ इन्शुरन्स...

अविवा लाइफ इन्शुरन्सचा सलग सातव्या वर्षी ‘भारतातील सर्वांत विश्वासार्ह प्रायव्हेट लाइफ इन्शुरन्स ब्रँड’ म्हणून गौरव ~अविवा लाइफ इन्शुरन्सने प्रायव्हेट लाइफ इन्शुरन्स श्रेणीत पुन्हा एकदा पहिले स्थान पटकावले ~

नवी दिल्ली पाच मे २०२५: विश्वासाचा अतूट वारसा जपत असताना अविवा लाइफ इन्शुरन्सला टीआरएच्या ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट २०२५ कडून सलग सातव्या वर्षी भारतातील सर्वांत विश्वासार्ह प्रायव्हेट लाइफ इन्शुरन्स ब्रँड म्हणून गौरव करण्यात आला आहे. खासगी जीवनविमा क्षेत्रात आपले नेतृत्व आणखी सक्षम करत असताना अविवा इंडियाने आर्थिक वर्ष २०२३-२४ मध्ये ३० दिवसांत १०० टक्के क्लेम सेटलमेंट करून सर्वोत्तम क्लेम सेटलमेंट टर्नअराऊंड साध्य केला आहे.

अविवा लाइफ इन्शुरन्सचे मुख्य मार्केटिंग अधिकारी श्री. विनित कपाही यांनी कृतज्ञता व्यक्त करताना सांगितले की, “अविवामध्ये आम्ही पारंपरिक संरक्षणापलीकडे जाऊन वचनबद्धता दर्शवतो. आम्ही प्रतिबंध, आरोग्य आणि सर्वांगीण कल्याण यांच्यावर लक्ष केंद्रित करून लाइफ इन्शुरन्सच्या क्षेत्राची व्याख्या नव्याने करण्यावर भर देत आहोत. आमच्या ग्राहकांना सकारात्मक उपाययोजना, आरोग्यासंबंधी माहिती आणि वैयक्तिक मार्गदर्शन देऊन आम्ही त्यांना अधिक सुदृढ आणि संपूर्ण आयुष्य जगण्यास मदत करतो. सलग सातव्या वर्षी भारताचा सर्वांत विश्वासार्ह लाइफ इन्शुरन्स ब्रँड म्हणून मिळालेला गौरव आमचे प्रयत्न खऱ्या अर्थाने त्यांच्या गरजा आणि महत्त्वाकांक्षांशी जुळणारे आहेत हे सिद्ध करतो.”

अविवा लाइफ इन्शुरन्स जीवनविमा उत्पादनांची एक संपूर्ण श्रेणी देऊन आपल्या विश्वासाच्या वारशावर कार्यरत राहण्यावर भर देत आहे. त्यात गॅरंटीड सेव्हिंग प्लॅन्स, टर्म प्लॅन्स, इन्व्हेस्टमेंट सोल्यूशन्स आणि रिटायरमेंट प्लॅन्सचा समावेश आहे. कंपनीने अलीकडेच अविवा सिग्नेचर ३डी टर्म प्लॅन- प्लॅटिनम आणला आहे. हा एक नॉन लिंक्ड, नॉन पार्टिसिपेटिंग प्युअर रिस्क लाइफ इन्शुरन्स प्लॅन आहे जो सर्वांगीण आर्थिक सुरक्षा देईल. हा प्लॅन फक्त संरक्षण देत नाही तर त्यात प्रिव्हेंटिव्ह वेलनेस पॅकेजही आहे. त्यामुळे पॉलिसीधारकांना कुटुंबाच्या आर्थिक भविष्याची काळजी घेताना आपल्या आरोग्याचीही काळजी घेता येते.
टीआरए रिसर्चचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. एन. चंद्रमौली यांनी अविवाच्या या उतम कामगिरीबाबत बोलताना सांगितले की, “आम्ही अविवा लाइफ इन्शुरन्सचे पुन्हा एकदा प्रायव्हेट लाइफ इन्शुरन्स श्रेणीत सर्वाधिक विश्वासू ब्रँड म्हणून झालेल्या गौरवाबाबत अभिनंदन करतो. हा सातत्यपूर्ण गौरव अविवावरील ग्राहकांच्या विश्वासाचे व विश्वासू आणि ग्राहककेंद्री विमा उपाययोजना देण्यातील त्यांच्या वचनबद्धतेचे प्रतीक आहे.”

टीआरए रिसर्चकडून प्रकाशित केला जाणारा ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट २०२५ हा १६ शहरांमधील हजारो ग्राहक- इन्फ्लुएन्सर्सकडून आलेल्या व्यापक ग्राहक माहितीवर आधारित आहे. त्यात ६००० पेक्षा अधिक तासांचे संशोधन आणि विश्लेषण समाविष्ट आहे. हा अभ्यास ब्रँड्सना एका सुनिश्चित विश्वास गुणांकनावर आधारित श्रेणी देतो. त्यात ६१ ब्रँड्समधील घटक, १० ब्रँड्सचे वर्तन आणि ३ विश्वासाचा पाया समाविष्ट आहे.

अविवा लाइफ इन्शुरन्सबाबत:
अविवा लाइफ इन्शुरन्स कंपनी इंडिया लिमिटेड ही डाबर इन्व्हेस्ट कॉर्प आणि अविवा इंटरनॅशनल होल्डिंग्स लिमिटेड या १६९६ पासून स्थापित आणि समृद्ध इतिहास असलेल्या यूकेस्थित विमा समूहाचा संयुक्त विद्यम आहे. अविवा लाइफ इन्शुरन्स इंडिया ही कंपनी नावीन्यपूर्ण विमा उपाययोजना आणि ग्राहककेंद्री उपाययोजनांद्वारे आपल्या ग्राहकांचे आर्थिक कल्याण जपण्यासाठी वचबनद्ध आहे.
वेबसाइट: www.avivaindia.com
अधिक माहितीसाठी कृपया संपर्क साधावा:
अपूर्वा निझारा | Apoorva.Nijhara@avivaindia.com | +918291446320
कोपल जैन | kopal.jain@edelman.com | +91 8109352502
श्रेण्या प्रियदर्शनी | shrenya.priyadarshini@edelman.com | +91 7021073983

टीआरए रिसर्चबाबत
टीआरए रिसर्च ही कॉम्निसायंट ग्रुपची ग्राहक माहिती आणि ब्रँड विश्लेषण कंपनी असून ती ब्रँड ट्रस्ट™ आणि ब्रँड डिझायर™ या दोन जागतिक ख्यातीच्या मालकीच्या निर्देशांकांद्वारे समभागधारकांचे वर्तन समजून घेऊन त्यांचे विश्लेषण करते. टीआरए रिसर्च ग्राहक तसेच समभागधारकांसोबत प्राथमिक संशोधन करून ब्रँड्सना टीआरए ग्राहक माहितीनुसार बिझनेसचे निर्णय घेण्यात मदत करते. टीआरए रिसर्च ही टीआरए ब्रँड ट्रस्ट रिपोर्ट आणि इंडियाज मोस्ट डिझायर्ड ब्रँड्सची प्रकाशक आहे.
अधिक माहितीसाठी कृपया येथे भेट द्या www.trustadvisory.info.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments