पुणे,५ मे २०२५ : आपटे रोड शिवाजी नगर येथे उभारण्यात आलेल्या ॲालविन फिनसर्व प्रा. लि.च्या नूतन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन करण्यात आले.
गेल्या १५ वर्षापासून म्युचुअल फंड गुंतवणूकीसाठी कार्यरत असलेल्या ॲालविन फिनानशिअल सर्विसेस् या भागीदारी संस्थचे रुपातंर ॲालविन फिनसर्व प्रा. लि या संस्थेत करण्यात आले आहे. हे रूपांतर होत असताना स्वतःच्या नवीन वास्तूमधे नविन कार्यालयाचे दिमाखदार उद्घाटन व्हाईटओक म्युचुअल फंडचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष सोमय्या, यांच्या हस्ते फीत कापून तसेच दिपप्रज्वलन करून करण्यात आले.
आशिष सोमय्या यांनी नवीन कार्यालयाची प्रशंसा केली. ॲालविन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेड च्या मालकी हक्क ते भागीदारी संस्था ते खाजगी मालकी संस्थेतील रुपांतराच्या १५ वर्षाच्या प्रवासाबद्दल आनंद व्यक्त केला. ॲालविन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडचे संचालक श्रीयुष ओसवाल,सुशिल मोरे,अंकुर गांधी,योगेश भावे यांना उज्ज्वल भवितव्यसाठी मार्गदर्शन करून शुभेच्छा दिल्या व ५०० कोटींचा व्यवस्थापन अंतर्गत मालमत्तेचा टप्पा पार केल्याबद्दल अभिनंदन केले.
म्युचुअल फंड क्षेत्रातील विविध दिग्गजांनी उपस्थिती दर्शवली. इंव्हेसको मुच्यअल फंडाचे देशातील रिटेल व संस्थात्मक विक्रीप्रमुख रोहित गोयल,कॅनरा रोबेकोचे मुख्य गुंतवणूक अधिकारी श्रीदत्त भांडवलदार यांनी नविन कार्यालयात येऊन ॲालविन संचालक मंडळाचा उत्साह वाढविला.
दोन दिवस चाललेल्या उद्घाटन च्या कार्यक्रमासाठी पहिल्या दिवशी पुण्यातील विविध म्युचुअल फंडातील कर्मचाऱ्यांनी तसेच व्यवसायातील प्रमुख वितरकांनी उपस्थित राहून आनंद द्विगुणित केला. दुसऱ्या दिवशी ॲालविनच्या विविध ठिकाणांहून आलेल्या गुंतवणूकदारांनी सकाळी १० ते संध्याकाळी ७ वाजेपर्यंत कार्यालयास भेट देऊन ॲालविन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक व कर्मचारी वर्गाचा उत्साह वाढविला. कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ॲालविन फिनसर्व प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक मंडळाने गुंतवणूकदारांना योग्यप्रकारे सेवा देण्यासाठी व आर्थिक साक्षरता करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असे सांगितले.


