Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedनगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया* *'ऑपरेशन सिंदूर' अभिमानास्पद*

नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांची प्रतिक्रिया* *’ऑपरेशन सिंदूर’ अभिमानास्पद*

जम्मू काश्मीरचा पहलगाम येथील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा बदला घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय सैनिकांनी ‘ऑपरेशन सिंदूर’ या मोहिमेअंतर्गत आज केलेली कारवाई प्रत्येक भारतीयासाठी अभिमानास्पद आहे.

पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ निष्पाप नागरिकांना प्राण गमवावे लागले. या हल्ल्यात ज्या अभागी महिलांना आपल्या पतीला गमवावे लागले, त्याचा बदला भारतीय जवानांनी’ऑपरेशन सिंदूर’द्वारे सडेतोड प्रत्युत्तर देत घेतला. चिमूटभर सिंदूरची किंमत काय असते याची जाणीव भ्याड पाकिस्तानला आणि दहशतवाद्यांना झाली असेल. देशभरातील प्रत्येक महिला भारतीयांसाठी ही अभिमानाची बाब आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार आणि लष्कराच्या तिन्ही दलांचे मी अभिनंदन करते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments