Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedराजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

राजगुरुनगर येथील वसतिगृह प्रवेशासाठी प्रवेश प्रक्रियेला सुरुवात

पुणे दि. 7 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्यविभागामार्फत सन 2025-26 या शैक्षणिक वर्षात बी.सी.ई.बी.सी मुलींचे शासकीय वसतीगृह राजगुरुनगर येथे प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे, अधिकाधिक विद्यार्थ्यांनी https://hmas.mahait.org या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

पाबळरोड येथील वसतिगृहात इयत्ता 8 वी व पुढील शिक्षण घेत असलेल्या मागासवर्गीय अनुसूचित जाती, अनूसुचित जमाती, विमुक्त जमाती भटक्या जाती, विशेष मागासप्रवर्ग, दिव्यांग व अनाथ मुलींना रिक्त जागांवर प्रवेश देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी गृहपाल बी.सी.ई.बी. सी. मुलींचे शासकीय वसतिगृह, राजगुरुनगर येथे कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे आवाहन गृहपालानी केले आहे.

****

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments