बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीजने दुसऱ्या सहा महिन्यांत आणि आर्थिक वर्ष 2025 मध्ये आवक आणि नफ्यात मजबूत वाढ नोंदवली
अहमदाबाद: बाहेती रीसायकलिंग इंडस्ट्रीज लिमिटेड (NSE: BAHETI), ही ॲल्युमिनियम रीसायकलिंग आणि ॲल्युमिनियम मिश्र धातु आणि डी-ऑक्स मिश्र धातुंच्या निर्मितीमध्ये गुंतलेली एक आघाडीची कंपनी आहे.
कंपनीने 31 मार्च 2025 रोजी संपलेल्या सहामाही आणि पूर्ण वर्षाचे आर्थिक निकाल जाहीर केले आहेत, ज्यात आवक आणि निव्वळ नफ्यात लक्षणीय वाढ झाली आहे.
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या सहामाही कालावधीसाठी, कंपनीने 26,716.90 लाख रुपयांची आवक नोंदवली जी मागील वर्षांची 22,265.92 लाख रूपये आवकपेक्षा 20% जास्त आहे. निव्वळ नफा 158.7% ने वाढून 1,098.93 लाख रुपये केला, जो मागील वर्षात ह्याच कालावधीत 424.77 लाख रुपये होता. हे उत्कृष्ट परिणाम कंपनीची मजबूत ऑपरेशनल कार्यक्षमता आणि वाढती मागणी दर्शवतात.
31 मार्च 2025 रोजी संपलेल्या पूर्ण आर्थिक वर्षासाठी, बाहेती रीसायकलिंग इंडस्ट्रीजने 52,453.87 लाख रुपयांची आवक नोंदवली होती. जी मागील वर्षात झालेली आवक 42,945 लाख रुपये पेक्षा 22.1% जास्त आहे. संपूर्ण आर्थिक वर्षासाठी कंपनीचा निव्वळ नफा 150% ने वाढून 1,800.98 लाख वर पोहोचला, जो एकावर्षाआधी 720.08 लाख होता. हे आंकडे सर्व व्यावसायिक क्षेत्रांमध्ये कंपनीची मजबूत कामगिरी दर्शवते.
परिणामांवर भाष्य करताना बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज लिमिटेडचे जॉइंट मॅनेजिंग डायरेक्टर यश शाह म्हणाले की “दुसऱ्या सहामाहीत आणि संपूर्ण आर्थिक वर्षातील मजबूत आर्थिक कामगिरी आमच्या व्यवसायाची लवचिकता आणि भारतातील पर्यावरणास अनुकूल शाश्वत रिसायकलिंग पद्धतींची वाढती ओळख दर्शवते. आम्ही ऑपरेशनल उत्कृष्टतेसाठी वचनबद्ध आहोत आणि अर्थव्यवस्थेत अधिक योगदान देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीज भारतातील स्क्रॅप प्रोसेसिंगआणि रिसायकलिंग मध्ये आघाडीवर आहे आणि 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये कंपनीचुव उपस्थिती आहे. कंपनी जपान, कॅनडा, यूएस, चीन, हाँगकाँग, UAE, तैवान इ. येथील ग्राहकांना सेवा देखील प्रदान करते. तिची सतत आर्थिक वाढ ॲल्युमिनियम रीसायकलिंग विभागातील एक विश्वासू पुरवठादार म्हणून तिचे स्थान मजबूत करते.
बाहेती रिसायकलिंग इंडस्ट्रीजचे शेअर्स सोमवारी 621 रुपये वर बंद झाले, जे पूर्वी 619.20 च्या बंद पेक्षा 0.29% जास्त होते. शेअर 628.85 रुपये वर उघडला आणि दिवसांत 77 लाख हून अधिकच्या व्यवसाय बरोबर 649.90 रूपये बरोबर 52 आठवड्यांचा नवीन उच्चांकही गाठला. कंपनीचे मार्केट कॅप रु. 643.89 कोटी होते.


