Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनतर्फे पुण्यातील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एरो मॉल येथे अत्याधुनिक...

ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनतर्फे पुण्यातील पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरील एरो मॉल येथे अत्याधुनिक प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन

केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते एरो मॉलमधील या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन करण्यात आले असून भारतातील वेगाने वाढणाऱ्या विमानवाहतूक क्षेत्रासाठी तरुणांना कौशल्ययुक्त बनविणे हे या प्रशिक्षण केंद्राचे उद्दिष्ट आहे.
पुणे, महाराष्ट्र | 11 मे, 2025 — पश्चिम भारतात विमानवाहतूक क्षेत्रासाठी आवश्यक कौशल्यविकासाच्या देण्यासाठी ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसची प्रशिक्षण शाखा असलेल्या ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनतर्फे (पुणे विमानतळावरील विमानतळ ग्राउंड हँडलिंग सेवांसाठी भारतीय विमानतळ प्राधिकरणाची परवाना प्राप्त संस्था) पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळालगत असलेल्या एरो मॉलमधील त्यांच्या प्रशिक्षण केंद्राचे उद्घाटन केले. या अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन भारत सरकारचे नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री श्री. मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते करण्यात आले.
हे नवीन प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून पुणे शहराचे भारतातील विमानवाहतूक क्षेत्रातील वाढते महत्त्व अधोरेखित होते. आतापर्यंत विमानतळ सेवा संचालनाचा महत्त्वाचा बेस असलेले हे शहर विमानचालन प्रशिक्षण आणि रोजगार संधी उपलब्ध करून देणार आहे.
“गुणवत्ता व अभिनवतेचे शहर ही कायमच पुण्याची ओळख राहिलेली आहे. उडान योजनेअंतर्गत हवाई जोडणीचा विस्तार आणि प्रवासी वाहतुकीतील वाढ यामुळे या भागातील युवा वर्गाला योग्य वेळी कौशल्यविकासाच्या संधी उपलब्ध होणार आहे”, असे नागरी विमान वाहतूक व सकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले. “पुण्यात गुंतवणूक केल्याबद्दल आणि भारताला जागतिक विमानचालन केंद्र म्हणून घडविण्याच्या भारत सरकारच्या व्हिजनला पाठबळ दिल्याबद्दल मी ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनची प्रशंसा करतो.”
ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशनच्या पुण्यातील केंद्रातर्फे विमानतळ ग्राउंड हँडलिंग, केबिन क्रू प्रशिक्षण, विमानतळ संचालन व व्यवस्थापन या विषयाचे पदविका व प्रमाणपत्र अभ्यासक्रम आणि पदवी अभ्यासक्रम एएमईटी विद्यापीठाच्या सहयोगाने उपलब्ध करून देण्यात येतील. शासन नियंत्रक संस्थांच्या आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र अभ्यासक्रमांना येथे आणण्याची तयारी सुरू असून, प्रत्यक्ष प्रशिक्षणाचा अनुभव देण्यासाठी पूर्ण सुसज्ज मॉक एअरक्राफ्ट कॅबिन विकसित करण्यात येत आहे.
“पुण्यात हे केंद्र सुरू करताना आम्हाला अभिमान वाटत आहे. यामुळे आम्हाला आमची इनहाउस मागणी पूर्ण करता येईल आणि विमातळावरील कामकाज क्षेत्राची करिअर म्हणून निवड करू इच्छिणाऱ्या संभाव्य एव्हिएटर्सना (विमानतळ क्षेत्रात कार्यरत तांत्रिक व व्यावसायिक कर्मचारी) सुयोग्य प्लॅटफॉर्म उपलब्ध होईल.”, असे ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसच्या व्यवस्थापकीय संचालक सरिता कुमारी म्हणाल्या. पुणे विमानतळावर 400 कर्मचारी कार्यरत असून त्यापैकी 95% कर्मचारी पुणे व आसपासच्या जिल्ह्यांतील आहेत. हे केंद्र म्हणजे, स्थानिक रोजगार, कौशल्य व विमानचालन उत्कृष्टता साध्य करण्याच्या आमच्या प्रतिबद्धतेचे विस्तारीकरण आहे.
पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या समोर असलेल्या भारतातील पहिल्या एअरपोर्ट मॉल संकुलात हे प्रशिक्षण केंद्र असून येथे प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना विमानतळ संचालनाच्या प्रक्रियेचा थेट आणि प्रत्यक्ष अनुभव घेता येतो. प्रशिक्षणार्थींना ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसच्या तज्ज्ञांशी थेट संवाद साधण्याची संधी मिळणार आहे. ही संस्था देशातील 23 विमानतळांवर कार्यरत असून, त्यामध्ये केवळ महाराष्ट्रातच पुणे, औरंगाबाद, जळगाव आणि सिंधुदुर्ग यांचा समावेश आहे. एक विमानतळ ग्राउंड हँडलिंग कंपनी म्हणून, महाराष्ट्रासह देशातील इतर भागांमध्ये आमची उपस्थिती वाढवण्याची आमची बांधिलकी कायम आहे. देशभरात विमानवाहतूक क्षेत्रातील पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षणाची गुणवत्ता उंचावण्याच्या आमच्या ध्येयासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत.
या प्रशिक्षण केंद्रात स्मार्ट वर्गखोल्या, मल्टिमीडिया सुविधांनी सुसज्ज प्रशिक्षण हॉल, सध्या विकसित होत असलेली कॅबिन क्रू प्रशिक्षण प्रयोगशाळा, करिअर मार्गदर्शन व प्लेसमेंटसाठी सहाय्य आणि पुणे विमानतळावर थेट प्रत्यक्ष अनुभव घेण्याची सुविधा उपलब्ध आहे.
देशातील वेगाने विकसित होणाऱ्या विमानतळांपैकी एक असलेल्या पुणे विमानतळावर आर्थिक वर्ष 2024–25 मध्ये 10.54 मिलियनहून अधिक प्रवाशांनी प्रवास केला असून, सध्या येथे मोठ्या प्रमाणावर विस्तारकाम सुरू आहे. देशांतर्गत तसेच प्रादेशिक उड्डाणांची वाढती मागणी लक्षात घेता, शहरात विविध पदांकरिता प्रशिक्षित विमानतळ कर्मचाऱ्यांची गरज झपाट्याने वाढत आहे.
ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन ब्रँडअंतर्गत चेन्नईमध्ये 2024 मध्ये सुरु झालेल्या प्रशिक्षण केंद्रानंतर पुणे हे त्यांचे दुसरे प्रशिक्षण केंद्र आहे. लवकरच कोची, अहमदाबाद आणि विशाखापट्टणम येथेही केंद्रे सुरु होणार आहेत.
ग्लोबल स्कूल ऑफ एव्हिएशन ही ग्लोबल फ्लाइट हँडलिंग सर्व्हिसेसची एक शाखा असून, ही संस्था अपडेटर सर्व्हिसेस लि. या समूहाचा भाग आहे. अपडेटर सर्व्हिसेस लि. ही भारतातील सर्वात मोठी एकात्मिक सुविधा व्यवस्थापन व व्यवसाय सहाय्य सेवा पुरवणारी कंपनी असून या कंपनीत 65,000 हून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत.
“हे केवळ प्रशिक्षण केंद्र नाही, तर हजारो भारतीय तरुणांसाठी विमानतळ क्षेत्रातील करिअरकडे जाणारा मार्ग आहे,” असे व्यवस्थापकीय संचालकांनी नमूद केले. “कोणत्याही तरुणाला — मग तो ग्राउंडवर काम करण्याची इच्छा बाळगत असो किंवा एअरक्रू व्हायचे स्वप्न पाहत असो — त्याला दर्जेदार शिक्षण, आंतरराष्ट्रीय प्रमाणपत्र आणि प्रत्यक्ष अनुभव मिळावा, यासाठी आमची कटिबद्धता आहे.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments