Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedकेईएम हॉस्पिटल पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सहयोगाने नवीन एसीसीयू...

केईएम हॉस्पिटल पुणे येथे रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या सहयोगाने नवीन एसीसीयू स्थापित

पुणे,10 मे 2025 : केईएम हॉस्पिटल,पुणे येथील बालरोग विभागात रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ सहयोगाने नवीन एसीसीयू (अक्युट चाईल्ड केअर युनिट) विभाग सुरू करण्यात आला आहे. . एसीसीयू विभागाच्या उद्घाटनप्रसंगी रोटरी प्रांत ३१३१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर शीतल शहा,रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या अध्यक्ष राधा गोखले, रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ चे अध्यक्ष मंदार अंबिके, रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडचे सचिव रोटेरियन हर्ष भावे, रोटेरियन शैलेश सिरसीकर,रोटेरियन सुबोध मालपाणी, प्रकल्प सेवा संचालक वैशाली देव यांसह केईएम हॉस्पिटल पुणेच चे वैद्यकीय संचालक डॉ.झक्सेस कोयाजी,मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया, बालरोग विभागाचे संचालक डॉ.आशिष बावडेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

हा नवीन विभाग अद्ययावत व सहाय्यक उपकरणांनी सुसज्ज असून गंभीर परिस्थितीतून बरे होण्याच्या मार्गावर असणाऱ्या परंतु सतत देखरेखीची गरज असलेल्या बालकांसाठी उपयुक्त ठरणार आहे.

याविषयी माहिती देताना केईएम हॉस्पिटल पुणेच्या बालरोग विभागाचे संचालक डॉ.आशिष बावडेकर म्हणाले की, पेडियाट्रिक इंटेंसिव्ह केअर युनिट (पीआयसीयू) म्हणजेच बालरोग अतिदक्षता विभागातून बरे होण्याच्या काळात सतत देखरेख व आधाराची आवश्यकता असलेल्या बालरोग रूग्णांना मदत करण्यासाठी या एसीसीयूची रचना करण्यात आली आहे. याशिवाय गंभीर आजाराने ग्रस्त असलेल्या परंतु त्वरित बालरोग अतिदक्षता विभागाची गरज नसलेल्या बालकांवर योग्य देखरेख आणि सहाय्यक प्रणालीसह प्रभावीपणे व्यवस्थापन करण्यासाठी उपयुक्त ठरेल.

ते पुढे म्हणाले की,एसीसीयूमध्ये 5 बहुकार्यक्षम बेडस असून प्रत्येक बेडजवळ देखरेखीसाठी मॉनिटर्स आणि एकात्मिक औषध वितरण प्रणाली आहे.यामध्ये इन्फ्युजन पंप्स,सिरींज पंप्स,हीटेड हाय – फ्लो नेझल कॅन्युला (एचएचएचएफएनसी) सारखी श्वसन सहाय्य प्रणाली आणि नेब्युलायझेशन युनिटचा समावेश आहे.याशिवाय तातडीच्या परिस्थितीचे व्यवस्थापन करण्यासाठी मेकॅनिकल व्हेंटिलेशन क्षमता आहे.

एसीसीयूमुळे बालरोग अतिदक्षता विभाग (पीआयसीयू) मधील वास्तव्याचा कालावधी कमी करण्यास मदत होणार असून गंभीर स्थिती असलेल्या बालकांसाठी बेडस मोकळे राहतील. याव्यतिरिक्त काळजीची गरज असलेल्या पण पीआयसीयूमध्ये दाखल करून घेण्याची गरज नसलेल्याच्या परिस्थितीत संसाधनांचा वापर योग्यरित्या करता येईल.

केईएम हॉस्पिटल पुणे च्या मुख्य कार्यकारी अधिकारी शिरीन वाडिया म्हणाल्या कि रोटरी क्लब ऑफ पुणे प्राईडच्या व रोटरी क्लब ऑफ पुणे साऊथ ने केलेल्या सहकार्यासाठी आम्ही त्यांना धन्यवाद देतो . केईएम च्या अनेक युनिट्स
अनेक विशेष युनिट्सपैकी, पीआयसीयू हे तज्ञ सल्लागारांच्या टीमच्या नेतृत्वासह उत्कृष्टतेच्या केंद्रांपैकी एक आहे. सामान्य माणसाला परवडणाऱ्या किमतीत उच्च दर्जाची उपचार सेवा प्रदान करण्याची आमची वचनबद्धता या प्रकल्पातून अधोरेखित होते . देणगी दिलेल्या उपकरणांचा इष्टतम वापर करून, आम्ही आमच्या देणगीदारांसोबत आणि सामान्य लोकांसोबत विश्वास आणि सद्भावनेचे मजबूत नाते निर्माण केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments