Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedदुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

दुचाकी मालिकेतील आकर्षक क्रमांक चारचाकींसाठी राखून ठेवता येणार

पुणे, दि. १३ : पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालय येथे दुचाकी वाहनांसाठी लवकरच नवीन मालिका सुरू होत आहे. या मालिकेतील आकर्षक नोंदणी क्रमांक तीनपट शुल्क भरून खासगी चारचाकी वाहनांसाठी राखून ठेवण्यासाठी तसेच उर्वरित क्रमांकाबाबत दुचाकींसाठी आगाऊ अर्ज स्वीकारण्याची व लिलाव कार्यपद्धतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

नव्याने सुरु होणाऱ्या दुचाकी मालिकेतील आकर्षक तसेच पसंतीचे क्रमांक चारचाकींसाठी हवे असलेल्या वाहन मालकांनी विहित तीनपट शुल्कासह १४ मे २०२५ रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत विहित नमुन्यात अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता अधिक आलेल्या अर्जांची यादी कार्यालयाच्या सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे धनाकर्ष (डीडी) १५ मे रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील, तर दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये लिलाव करण्यात येईल.

दुचाकी वाहन मालकांनी आकर्षक तसेच पसंतीच्या क्रमांकासाठी १५ मे रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत अर्ज करावा. एकाच क्रमांकाकरीता अधिक आलेल्या अर्जांची यादी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. लिलावाचे डीडी १६ मे रोजी दुपारी २.३० वाजेपर्यंत स्वीकारले जातील. प्राप्त अर्जाचा लिलाव त्याच दिवशी दुपारी ४ वाजता सहकार सभागृहामध्ये करण्यात येईल.

अर्ज कार्यालयाच्या खासगी वाहन नोंदणी विभागात ‘आर.टी.ओ., पुणे’ यांच्या नावे धनाकर्ष (डीडी), पत्त्याचा पुरावा, आधारकार्ड, ओळखपत्र, पॅनकार्डच्या साक्षांकित प्रतीसह आधार कार्डला लिंक असलेल्या मोबाईल क्रमांकासह जमा करावा.

पसंती क्रमांक आरक्षित करण्याकरिता तसेच अधिक माहितीसाठी https://fancy.parivahan.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी, असेही सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी पुणे यांनी कळविले आहे.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments