Wednesday, September 9, 2026
Google search engine
HomeUncategorizedसैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न

सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी सैनिक दरबार संपन्न

पुणे, दि. १३ : माजी सैनिकांच्या अडीअडचणी सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सैनिक दरबार’ आयोजित करण्यात आला.

यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्रीमती ज्योती कदम, पोलीस उप आयुक्त, आर्थिक व सायबर गुन्हे विवेक मासाळ, जिल्हा परिषदेचे सहा. विशेष अधिकारी श्री. बी. दरवडे, तहसिलदार (महसूल शाखा) उमाकांत कडनोर, निवृत्त कर्नल प्रमोद दहीतुले तसेच इतर कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व जिल्ह्यातील २५० हून अधिक वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, सेवारत, सेवानिवृत्त अधिकारी, सेवारत, माजी सैनिक व माजी सैनिक विधवा पत्नी उपस्थित होते.

या सैनिक दरबारासाठी जिल्ह्यातून ९० अर्ज प्राप्त झाले होते. या सर्व अर्जावर जिल्हाधिकारी यांनी चर्चा करुन अर्जदारांचे प्रश्न सोडविण्यासाठी संबंधित विभागाकडे आलेले अर्ज कार्यवाहीसाठी पाठवून त्यांचा अहवाल घेण्याबाबत आदेश दिले. पुढील सैनिक दरबार ३० जून २०२५ रोजी आयोजित करण्यात येईल तसेच आजच्या दरबारातील अर्जांवर केलेल्या कार्यवाहीची माहिती देण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी लेफ्टनंट कर्नल स. दै. हंगे (निवृत्त) यांनी उपस्थितांना सैनिक कल्याण विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधा व योजनांची माहिती दिली.

00000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments