पुणे, दि. ३० : पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून जून महिन्यात पक्क्या अनुज्ञप्तीसाठी शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी कळविले आहे.
पिंपरी चिंचवड प्रादेशिक परिवहन कार्यालयामार्फत खेड येथे २ व ३ जून, मंचर येथे ९ व १० जून, जुन्नर येथे १६, १७ व १८ जून, वडगाव मावळ येथे २३ व २४ जून तर लोणावळा येथे २६ व २७ जून या दिवशी पक्की अनुज्ञप्ती शिबीर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
पक्क्या अनुज्ञप्तीचा कोटा ३० मे २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता उपलब्ध होणार असल्याचेही प्रादेशिक परिवहन अधिकारी पिंपरी चिंचवड यांनी कळविले आहे.
०००००


