Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedइलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड फोटोनिक्स आधुनिक तंत्रज्ञान व नवनिर्मितीतून ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर दोन दिवसीय...

इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड फोटोनिक्स आधुनिक तंत्रज्ञान व नवनिर्मितीतून ‘आत्मनिर्भर भारत’ विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद एमआयटी डब्ल्यूपीयूत ९ फेब्रुवारी पासून

पुणे, दि. ८ फेब्रुवारी: एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्याा स्कूल ऑफ फिजिक्स अ‍ॅण्ड इलेक्ट्रीकल्स तर्फे इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड फोटोनिक्समध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि नवनर्मितीच्या माध्यमातून ‘आत्मनिर्भर भारत’ या विषयावर दोन दिवसीय राष्ट्रीय पातळीवरील परिषदेचे आयेाजन करण्यात आले आहे. भारत सरकारच्या वैज्ञानिक और औद्योगिक अनुसंधान विभाग (डीएसआईआर) तर्फे ही परिषद होणार आहे. अशी माहिती एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू व परिषदेचे संयोजक डॉ. मिलिंद पांडे व दिल्ली येथील आयआयएफटीच्या माजी संचालिका डॉ. विजया कट्टी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.
या परिषदेचे उद्घाटन शुक्रवार दि. ९ फेब्रुवारी सकाळी १० वा. कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयूच्या स्वामी विवेकानंद सभागृहात होणार आहे. यावेळी डीएसआयआर, भारत सरकारच्या सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीच्या ज्येष्ठ वैज्ञानिक जी डॉ. सुजाता चकलानोबीस या प्रमुख पाहुणे असतील. तसेच ऑप्टिकल फायबर आणि ग्लास प्लोट स्टरलाइट टेक्नॉलॉजीज लि. चे प्रमुख संजित सिंह भाटिया हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
अध्यक्षस्थानी एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ विश्वनाथ दा. कराड असतील. या परिषदेला एमआयटी डब्ल्यूपीयूचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांचे मार्गदर्शन लाभले आहे.
समारोप शनिवार दि. १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. यावेळी नवी दिल्ली येथील दक्षिण पश्चिम आशिया कार्यालय, युनायटेड नेशन्स एस्केपचे उपप्रमुख डॉ. राजन एस रत्ना हे प्रमुख पाहुणे असतील. तसेच मुंबई येथील रिलायन्स जिओचे उपाध्यक्ष डॉ. मुनीर सय्यद हे सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
फोटोनिक्स इलेक्ट्रॉनिक्स तंत्रज्ञानामध्ये कृत्रिम तंत्रज्ञानाची भूमिका समाविष्ट करणे, इलेक्ट्रॉनिक्स उपकरणे आणि उपकरणांच्या जटिल उत्पादन प्रक्रियेच्या तंत्रज्ञानाचे हस्तांतरण करणे. या क्षेत्रात एफडीआय आकर्षित करण्यासाठी प्रोत्साहन प्रस्तावित करणे आणि फोटोनिक्स व इलेक्ट्रॉनिक्स उद्योगाच्या संदर्भात आत्मनिर्भरतचे आर्थिक प्रारूप मॉडेल स्थापित करणे आवश्यक आहे.
त्याच प्रमाणे संयुक्त उपक्रम स्थापन करण्यात स्वारस्य असलेल्या निवडक फोटोनिक्स उद्योग समूहांशी सल्लामसलत करुन उद्योगाच्या गरजांनुसार संशोधन आणि इकोसिस्टमचा विकास करणे, त्याच प्रमाणे विविध क्षेत्रांतील अनुभवी शास्त्रज्ञ, विद्यार्थी व संशोधन यांच्यात त्यांच्या करिअरच्या सुरूवातीच्या टप्प्यावर परस्पर संवाद वाढविणे हा आहे.
या परिषदेचे मुख्य उद्दिष्टये म्हणजे वैज्ञानिक ज्ञानाची देवाण घेवाण करताना, जागतिक व्यासपीठावर त्यांचे नाविन्यपूर्ण विचार आणि अद्वितीय संशोधन कल्पना व्यक्त करण्यासाठी फोटोनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स या क्षेत्रातील विद्यार्थी, संशोधन अभ्यासक, प्राध्यापक, शास्त्रज्ञ आणि उद्योग क्षेत्रातील व्यक्ती यांना एक परिपूर्ण व्यासपीठ उपलब्ध करून देणे आहे.
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुसार आत्मनिर्भर भारतासाठी कौशल्य वृद्धी अत्यंत महत्वाची आहे. त्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स विभागात ही उन्नती गरजेची आहे. आत्मनिर्भर भारतासाठी उद्योग, शिक्षण यांच्यातील परस्पर संवादातून नव संशोधन होणे गरजचे आहे. यातून नव उद्योग उदयास येतील आणि त्यातून देशात मोठी आर्थिक उलाढाल होणार आहे व भारत त्या दिशेने वाटचाल होणार आहे.
आयोजित पत्रकार परिषदेत डॉ. संजय कामतेकर, डॉ. भरत चौधरी, परिषदेचे महासचिव डॉ.आविष्कार कट्टी, डॉ.रामकृष्ण मन्नतकर व डॉ.अंजली साने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments