Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedएचडीएफसी लाइफने अहमदाबाद विमान दुर्घटनेतील व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांसाठी क्‍लेम सबमिशन प्रक्रिया सोपी केली

एचडीएफसी लाइफने अहमदाबाद विमान दुर्घटनेतील व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांसाठी क्‍लेम सबमिशन प्रक्रिया सोपी केली

मुंबई, १३ जून २०२५: अहमदाबादमध्ये नुकत्याच झालेल्या दुर्दैवी विमान दुर्घटनेतील व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांना त्वरित मदत देण्यासाठी भारतातील आघाडीची जीवन विमा कंपनी एचडीएफसी लाइफने त्यांची क्‍लेम सबमिशन करण्याची प्रक्रिया सोपी केली आहे.

स्थानिक सरकार, पोलिस किंवा हॉस्पिटल्‍सनी जारी केलेला मृत्यूचा पुरावा देऊन पॉलिसीधारकांच्या नामनिर्देशित व्यक्‍ती/कायदेशीर वारसांना क्‍लेम करता येऊ शकतो.

काही शंका असल्यास किंवा मदतीची आवश्यकता असल्यास एचडीएफसी लाइफशी खालील टचपॉइण्‍ट्सच्‍या माध्‍यमातून संपर्क साधा:

समर्पित क्‍लेम हेल्पलाइन: ०२२-६८४४६५२९

समर्पित नोडल अधिकारी: +९१ ९५५८८२१९८०

कॉल सेंटर क्रमांक: ०२२-६८४४६५३०

व्हॉट्सअॅप: +९१ ८२९१८९०५६९

ईमेल: service@hdfclife.com

दावेदारांना एचडीएफसी लाइफच्या कोणत्याही शाखा कार्यालयात जायचे असल्‍यास ते जवळच्या शाखेच्या स्थानासाठी खालील लिंकवर क्लिक करू शकतात. सर्व शाखांमध्‍ये एचडीएफसी लाइफच्या स्थानिक शाखेचे कर्मचारी दावेदारांना प्रत्‍यक्ष मदत करतील.

https://www.hdfclife.com/contact-us#BranchLocator

एचडीएफसी लाइफचे मुख्य कार्यकारी अधिकारी समीर योगीश्‍वर आपले मत व्‍यक्‍त करत म्‍हणाले, ”या दुर्घटनेत मृत्‍यू झालेल्‍या सर्व व्‍यक्‍तींच्‍या कुटुंबांप्रती आम्ही मनापासून संवेदना व्यक्‍त करतो. या दुःखाच्या काळात आम्ही आमच्या पॉलिसीधारकांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. क्‍लेमशी संबंधित प्रत्येक शंकेचे प्राधान्याने निराकरण केले जाईल. आम्ही सुरळीत आणि सोपी क्‍लेम प्रक्रिया सुनिश्चित करून या कुटुंबांना आधार देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्‍न करू.”

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments