Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सने भारतीय प्रिसिजन प्रॉडक्ट्स उत्पादक मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेडसोबत केला...

सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सने भारतीय प्रिसिजन प्रॉडक्ट्स उत्पादक मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेडसोबत केला नवीन सामंजस्य करार

मुंबई, 19 जून 2025: एअरक्राफ्ट इंजिन्सच्या डिझाईन, विकास आणि उत्पादन क्षेत्रातील जागतिक अग्रगण्य फ्रेंच इंजिन उत्पादक कंपनी सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स आणि बंगळुरूस्थित अग्रगण्य एरोस्पेस प्रिसिजन प्रॉडक्ट्स उत्पादक आणि रेमंड लिमिटेड समूहाची कंपनी असलेल्या मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड यांनी CFM LEAP इंजिनसाठी असेंबल केलेली उत्पादने पुरवण्यासाठी नवीन दीर्घकालीन करारावर स्वाक्षरी केली आहे.

 

 

 

या घोषणेमुळे सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्स आणि मैनी प्रिसिजन प्रॉडक्ट्स लिमिटेड (MPPL) यांच्यातील सहकार्याचा एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. MPPL आधीपासूनच विविध प्रकारचे टर्बाइन वेन्स, फोर्ज आणि मशीन केलेले मेटॅलिक प्रॉडक्ट्स सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सला पुरवत आहे. हा करार भारताच्या एरोस्पेस उत्पादन क्षेत्राच्या जागतिक पुरवठा साखळीत वाढत्या समावेशाचे आणि सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सच्या ‘मेक इन इंडिया’ उपक्रमाच्या दृढीकरणाचे द्योतक आहे. या सामंजस्य करारावर (MoU) पॅरिस एअर शो, ली बोरगेट 2025 मध्ये सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सचे परचेजिंग व्हीपी श्री. डॉमीनिक डूपे आणि MPPL चे व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम मैनी यांनी रेमंड समूहाचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. गौतम सिंघानिया यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी केली.

 

 

 

“CFM56 आणि LEAP पार्ट्सच्या मशीनिंगमध्ये आम्ही गेल्या 25 वर्षांपासून MPPL सोबत भागीदारी केली आहे,” असे सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्सचे परचेजिंग व्हीपी डॉमीनिक डूपे यांनी सांगितले. “आज, आम्ही आमच्या या विश्वासू सहयोगीवरील आमचा विश्वास पुन्हा दृढ करत आहोत आणि LEAP इंजिनच्या उत्पादन वाढीसाठी आणि भारतातील आमचे स्थान अधिक बळकट करण्यासाठी हे सहकार्य विस्तारत आहोत.”

 

 

 

या सामंजस्य करारांतर्गत MPPL हे सिंगल-आइसल मुख्य प्रवाहातील व्यावसायिक जेट्सना सामर्थ्य देत CFM LEAP इंजिन कॉम्बस्टर साठी मशीन्ड असेंब्लीजचे उत्पादन करेल. हा करार सुरुवातीला पाच वर्षांसाठी असून सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्ससाठी अत्याधुनिक मेटॅलिक उत्पादने आणि सर्वोच्च दर्जाची कामकाज उत्कृष्टता पुरविण्याच्या MPPL च्या दीर्घकालीन बांधिलकीचे प्रतिक आहे.

 

 

 

जागतिक एरोस्पेस कंपन्यांमध्ये लक्षणीय ठसा उमटविलेली MPPL सॅफ्रान एअरक्राफ्ट इंजिन्ससाठीची दीर्घकालीन पुरवठादार आहे. सॅफ्रान कंपनी ही MPPL ची पहिली एरोस्पेस ग्राहक होती. आणि गेल्या दोन दशकांहून अधिक काळापासून N2, N3 आणि N4 या अत्यावश्यक इंजिन भागांची एक पसंतीची पुरवठा करणारी कंपनी राहिली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments