Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedवारकऱ्यांसाठी मोफत मुळव्याध ऑपरेशन डॉ. कुणाल कामठे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी सेवाभावी पाऊल

वारकऱ्यांसाठी मोफत मुळव्याध ऑपरेशन डॉ. कुणाल कामठे यांच्याकडून वारकऱ्यांसाठी सेवाभावी पाऊल

पुणे : विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या वारकऱ्यांना मुळव्याधाचा त्रास असल्यामुळे वारीच्या प्रवासात मोठा अडथळा निर्माण होतो. अशा गरजू भक्तांसाठी पुण्यातील डॉ. कुणाल कामठे यांनी पुढाकार घेत वारकऱ्यांसाठी मोफत मुळव्याध ऑपरेशन हा उपक्रम राबविला आहे.

 

शरीर निरोगी असेल तरच भक्तीची अनुभूती घेता येते. ही बाब लक्षात घेऊन कोंढवा येथील डॉ. कामठे पाईल्स क्लिनिककडून आयुर्वेद व आधुनिक तंत्रज्ञानाने मोफत शस्त्रक्रिया केली जाणार आहे. नावनोंदणी २० जूनपासून सुरु होणार असून, ही सुविधा मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध असणार आहे.

 

यासाठी नावनोंदणी आणि पूर्वतपासणी बंधनकारक असून, रक्त तपासणी व ईसीजी करणे आवश्यक आहे. सकाळी १० ते संध्याकाळी ७ या वेळेत ही सेवा दिली जाईल. अनुभवी डॉक्टर्स आणि कुशल आरोग्यसेवकांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णसेवा दिली जाईल.

 

वारकरी बंधूंनी ८८८८८६६१८५ यानंबर वर तसेच १०१, इंद्रप्रस्थ लैण्डमार्क, गंगाधाम – शत्रुंजय रोड ,शांतिनगर सोसायटी जवळ , कोंढवा बुद्रुक, पुणे येथे संपर्क करीत या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. नोंदणीकरिता दिंडी क्रमांक, दिंडी प्रमुख नाव व नंबर आवश्यक आहे. तरी वारीचा आनंद आरोग्यपूर्ण अवस्थेत सर्वांनी घ्यावा, असे आवाहन डॉ. कुणाल कामठे, डॉ. कामठे पाईल्स हॉस्पिटल आणि मंगल फाउंडेशन, पुणे यांच्या वतीने करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments