Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedटिळक रोडवरील पूर्व प्राथमिक शाळेत साजरा झाला  वारकऱ्यांसोबत संगीत योगा 

टिळक रोडवरील पूर्व प्राथमिक शाळेत साजरा झाला  वारकऱ्यांसोबत संगीत योगा 

 

 

21 जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिवस आणि म्युझिक दिन म्हणून साजरा केला जातो. यंदा याच दिवशी पुण्यात पालख्यांचा मुक्काम आहे याचेच औचित्य साधून पालक, विद्यार्थी आणि वारकरी यांचा एकत्र मिळून योगा दिवस टिळक रोडवरील डेक्कन एज्युकेशन सोसायटीची पुर्व प्राथमिक मुरलीधर लोहिया मातृमंदिर शाळेत साजरा केला. सामाजिक बांधीलकी जपण्यासाठी विद्यार्थ्यांनी वारकऱ्यांसाठी तिखट, मसाले, वरई स्वच्छतेच्या वस्तु इत्यादि भेट म्हणून आणल्या होत्या. सर्वांचा योगा झाल्यावर माऊलीच्या नामघोषात नवी पेठ विठ्ठल मंदिराचे अध्यक्ष शंकरराव निवंगुणेआणि मुख्याध्यापिका माधुरी बर्वे यांच्या हस्ते भेट वस्तू वारकऱ्यांना सुपूर्त केल्या. श्री. प्रशांत सुर्वे यांचे विशेष सहकार्य लाभले. माजी अध्यक्ष श्री. बाळासाहेब काळभोर आणि समीर पवार यांची विशेष उपस्थिती होती. शिक्षिका प्रियांका शेंडकर, अमृता महाबळेश्वरकर आणि रती काळभोर यांनी योगासनांची प्रात्यक्षिके सादर केली. सरतेशेवटी अल्पोपाहार करून हा माधुरी बर्वे यांच्या नेतृत्वाखाली उपक्रम आनंदात पार पडला.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments