Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट तर्फे पं

श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट तर्फे पं

पुणे : श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट च्या वतीने पुणे ते पंढरपूर पालखी मार्गावर वारकरी बांधवांसाठी मोफत पाणी टँकर सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. वारीदरम्यान हजारो वारकरी पायी प्रवास करतात, प्रवासात पाण्याची गरज प्रकर्षाने भासते. ही गरज लक्षात घेऊन ट्रस्टतर्फे सामाजिक भान राखत विविध ठिकाणी टँकरद्वारे पाणी वाटप करण्यात येत आहे. या उपक्रमाचा लाभ हजारो वारकऱ्यांना होत असून, ही टँकर सेवा सतत कार्यरत आहे.

 

दीपक थोरात यांनी सांगितले की, श्री लकडीपूल विठ्ठल मंदिर ट्रस्ट, वामन दत्त मंदिर ट्रस्ट आणि वारकरी सेवा संघ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सलग तिसऱ्या वर्षी पुणे ते पंढरपूर वारीदरम्यान वैद्यकीय सेवा देण्यात येत आहे. या सेवेमध्ये दोन ॲम्बुलन्स, डॉक्टरांचे पथक, थेरपीस्टसह १० ते १२ सेवकांचा समावेश आहे. हे सर्व सेवक पंधरा दिवस अहोरात्र सेवा बजावत आहेत. वारकऱ्यांना पायांतील दुखण्यांवर फुट मसाज थेरपी देण्यात आली तसेच आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराचा ८०० हून अधिक वारकऱ्यांनी लाभ घेतला.

 

याशिवाय, स्टोक्स फाउंडेशनचे चेतन पानसरे यांच्या वतीने दिंडी क्रमांक ३३, दिंडी क्रमांक २०, टाकळकर दिंडी (जालना) आणि पुण्यातील सामाजिक संस्था राष्ट्रीय कला अकॅडमी यांना तंबू भेट म्हणून देण्यात आले. वारीच्या काळात अत्यंत गरजेची ठरणारी ही सुविधा वारकरी बांधवांसाठी उपयुक्त ठरली. सालाबादप्रमाणे तीन दिंड्या श्री लकडीपूल विठ्ठल मंदिरात उतरत असतात. या सर्व दिंड्यांच्या निवास व भोजनाची संपूर्ण व्यवस्था गेली अनेक वर्षे ट्रस्टच्या वतीने भक्तिभावाने केली जात आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments