Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedसुझलॉन पॉवर्सला ॲम्पिन एनर्जी ट्रान्झिशनकडून सलग तिसऱ्यांदा 170.1 मेगावॅट ऑर्डर मिळाल्याने ती...

सुझलॉन पॉवर्सला ॲम्पिन एनर्जी ट्रान्झिशनकडून सलग तिसऱ्यांदा 170.1 मेगावॅट ऑर्डर मिळाल्याने ती आता आघाडीवर आहे ऊर्जा क्षेत्रातील दोन देशी नेत्यांनी भागीदारी घनिष्ठ केली आहे जेणेकरून भारताच्या ऊर्जा वितरण क्षेत्राचे कार्बनीकरण कमी करता येईल

पुणे, भारत: भारताच्या स्वच्छ ऊर्जेच्या आकांक्षांना महत्वपूर्ण प्रोत्साहन देता यावे म्हणून सुझलॉन ग्रुप आणि ॲम्पिन एनर्जी ट्रान्झिशन या देशातील दोन आघाडीच्या मेक इन इंडिया विजेत्या कंपन्या, डिस्कॉमचे कार्बनीकरण कमी करून कमी कार्बन अर्थव्यवस्थेकडे देशाचे संक्रमण वेगाने सुरू करण्यासाठी एकत्र आलेल्या आहेत. आंध्र प्रदेशातील कुरनूल येथे विकसित केल्या जाणाऱ्या 170.1 मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पासाठी सुझलॉनला ॲम्पिनकडून सलग तिसऱ्यांदा ऑर्डर मिळालेली आहे.

 

भारतीय उद्योगाला स्थानिक पातळीवर तयार केलेल्या अक्षय ऊर्जा समाधानांनी प्रोत्साहन दिलेल्या स्वच्छ, अधिक आत्मनिर्भर ऊर्जा भविष्याकडे संक्रमण करता येण्याचा एक एकत्रित दृष्टिकोन या निरंतर सहकार्यातून दिसून येत आहे. सुझलॉन आणि ॲम्पिन एकत्रितपणे भारतीय व्यवसायांसाठी हरित ऊर्जा सुलभ आणि परवडणारी बनविण्यासाठी खूप महत्वपूर्ण कार्य करत आहेत.

 

कराराचा एक भाग म्हणून, सुझलॉन प्रत्येकी 3.15 मेगावॅट रेटेड क्षमता असलेल्या हायब्रिड लॅटिस टॉवर्स (एच.एल.टी) सोबत आपल्या 54 प्रगत एस144 विंड टर्बाइन जनरेटर्स (डब्ल्यू.टी.जी) पुरविणार आहे. उपकरणे पुरविणे व स्थापना करणे पासून ते चालू करणे व दीर्घकाळ चालविणे व देखभाल सेवा करणे, अशी या कार्यक्षेत्रात संपूर्ण प्रकल्पाची अंमलबजावणी करणे सामील आहे.

 

जे. पी. चलसानी, मुख्य कार्यकारी अधिकारी, सुझलॉन ग्रुप म्हणाले की, “वितरण पातळीवर भारताचा कार्बनीकरण कमी करण्याचा प्रवास जिंकला जाईल किंवा हरला जाईल. उद्योगांपासून ते घरापर्यंत डिस्कॉम हे अक्षय ऊर्जा निर्मिती आणि दैनंदिन वापर यांच्यातील महत्त्वपूर्ण दुवा आहेत. त्यांना विश्वासार्ह, किफायतशीर स्वच्छ ऊर्जेने सबल करणे हे फक्त एक ध्येय नसून ती एक राष्ट्रीय पातळीवर अनिवार्य गोष्ट आहे. एकत्रितपणे, स्वच्छ ऊर्जा फक्त यशस्वी होऊ शकेल अशी नसून ती ऊर्जा क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण, मापता येण्याजोगी आणि कायापालट करणारी आहे, हे आम्ही सिद्ध करीत आहोत.”

 

  • विवेक श्रीवास्तव, मुख्य कार्यकारी अधिकारी, भारत व्यवसाय, सुझलॉन ग्रुप म्हणाले, “ॲम्पिनकडून तीन ऑर्डर्स मिळाल्याने एकत्रित मिशनची शक्ती दिसून येत आहे. एकत्र; आम्ही स्वावलंबी, परवडण्याजोग्या आणि शाश्वत ऊर्जा भविष्याकडे जाण्याची बांधिलकी स्वीकारलेली आहे आणि हे भारताच्या ऊर्जा वितरण पायाभूत सुविधांचे कार्बनकरण कमी करण्यात नवकल्पना, स्थानिक उत्पादन आणि गहन क्षेत्रीय तज्ञतेचे मिश्रण करून साध्य केले जात आहे.”
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments