Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedपिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे व झाडे लावण्याचे आयुक्त तथा...

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे व झाडे लावण्याचे आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांचे आवाहन महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाचे वृक्ष लागवड मोहिमे अंतर्गत १.५ लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट

पिंपरी, दि. २३ जून २०२५ : पिंपरी चिंचवड शहरातील सध्याच्या हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर वृक्षलागवड ही काळाची गरज बनली आहे. झाडे लावणे हे सोपे काम असले तरी ती जगवणे आणि ती संवर्धित करणे हेच खरे कार्य आहे. प्रत्येक नागरिकाने वृक्षारोपण मोहिमेत सहभागी व्हावे व शहर सुंदर व हरित करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी केले. महापालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागच्या वृक्षारोपण अभियानाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी सिंह बोलत होते.

यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, सह शहर अभियंता देवन्ना गट्टूवार, मनोज सेठिया, सहाय्यक आयुक्त उमेश ढाकणे, कार्यकारी अभियंता सुनील पवार, माजी नगर सदस्य चंद्रकांत नखाते, बीआरटीचे कार्यकारी अभियंता चंद्रकांत मोरे, महापालिका उद्यान विभागाचे उद्यान अधीक्षक महेश गारगोटे, योगेश वाळूंज, सहाय्यक उद्यान अधिक्षक राजेश वसावे, उद्यान निरीक्षक ज्ञानेश्वर कांबळे, उद्यान सहाय्यक प्रदीप गजरमाने, तसेच ग्रीन यात्रा यांच्या सह अनेक सामाजिक संघटना देखील सहभागी होत्या.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने पर्यावरण संवर्धन आणि हरित शहर निर्माण करण्याच्या उद्देशाने वृक्षारोपण मोहीम उपक्रम हाती घेतला आहे. या वृक्षारोपण अभियानांतर्गत शहरात दीड लाख देशी झाडांची लागवड करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.. यामध्ये ताम्हण, बहावा, नीम, शिसव या वृक्षांसारख्या विविध देशी व पर्यावरणपूरक प्रजातींची झाडे लावली जाणार आहेत. तसेनअन्य देशी झाडांच्या प्रजांतीचा देखील समावेश आहे. या झाडांची निवड जैवविविधतेच्या संवर्धनासोबतच स्थानिक हवामानाशी सुसंगत राहील यासाठी करण्यात आली आहे.

कोट – १

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या समन्वयाने हाती घेण्यात आलेल्या या वृक्ष लागवड मोहिमेस शहरातील नागरिकांसह अनेक समाजिक संघटना देखील सहकार्य करत आहेत. चला तर मग एकत्र येऊया ‘आपले शहर हरीत शहर’ करूया …

प्रदीप जांभळे पाटील, अतिरिक्त आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका

 

कोट -२

या वृक्ष लागवड मोहिमेत उद्यान व वृक्ष संवर्धन विभागाच्या वतीने दीड लाख देशी झाडे लावण्यात येणार आहेत. आपल्या परिसरात वृक्ष लागवड करावात्याचे असल्यास आम्हाला कळवा आपण एकत्रिपणे तेथे देशी वृक्षांची लागवड करू व आपल्या शहराला अधिक हरित करू.

उमेश ढाकणे, सहाय्यक आयुक्त, उद्यान व वृक्ष संवर्धन विभाग, पिंपरी चिंचवड महानगरपा

  • लिका
RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments