Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedग्राहककेंद्री दृष्टिकोन : BFSI क्षेत्रातील विश्वास आणि विकासाचा पाया

ग्राहककेंद्री दृष्टिकोन : BFSI क्षेत्रातील विश्वास आणि विकासाचा पाया

सतत वेगाने बदलत असलेल्या बँकिंग, वित्तीय सेवा आणि विमा (BFSI) क्षेत्रात ग्राहककेंद्री दृष्टिकोन ही गोष्ट शाश्वत विकासासाठी एक आधारस्तंभ म्हणून उदयास येत आहे. डिजिटल परिवर्तन या क्षेत्राला नव्याने आकार देत असताना विश्वास आणि निष्ठा निर्माण करण्यासाठी BFSI क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्या वैयक्तिकृत अनुभवांना प्राधान्य देत आहेत. आघाडीच्या कंपन्या डेटावर आधारित सूचना, माहिती आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून सेवाप्रक्रिया सुसंगत करत आहेत, प्रक्रियेतील अडथळे दूर करत आहेत आणि ग्राहक प्रवास अधिक सुलभ करत आहेत. अखंड डिजिटल बँकिंगपासून ते सानुकूलित विमा उपायसुविधांपर्यंत पारदर्शकता आणि सुरक्षिततेची खात्री देत ग्राहकांच्या सतत बदलणाऱ्या गरजा पूर्ण करणे यावर लक्ष केंद्रित केले जात आहे.

 

 

 

गोदरेज कॅपिटलचे सीएमओ नलिन जैन म्हणाले, “ग्राहककेंद्री दृष्टिकोन हा आमच्या धोरणाचा मूलभूत भाग आहे. ग्राहकांच्या गरजा सखोल समजून घेऊन आणि प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून विश्वास निर्माण करणारा आणि दीर्घकालीन मूल्यनिर्मिती करणारा अनुभव आम्ही देतो.” हा दृष्टिकोन संपूर्ण BFSI क्षेत्रात दिसून येतो. या क्षेत्रात कंपन्या ग्राहकांची पसंती आधीच समजून घेणारी एआय सक्षम साधने आणि CRM प्रणालींमध्ये गुंतवणूक करत आहेत आणि विनाअडथळा सेवा पुरवण्यावर भर देत आहेत. उदाहरणार्थ, बँका वैयक्तिकृत कर्ज उत्पादने देण्यासाठी भविष्यवेधी विश्लेषणाचा वापर करत आहेत, तर विमा कंपन्या दावा प्रक्रिया सुलभ करून ग्राहकांचे समाधान वाढवत आहेत.

 

 

 

ग्राहककेंद्री मॉडेल्सकडे होणारी ही वाटचाल विविध कार्यपद्धतींतील भिंती दूर करत आहे आणि ग्राहकांच्या अपेक्षांशी सुसंगतपणे सर्व कामकाज एकत्र आणत आहे. हे धोरण केवळ ग्राहक टिकवून ठेवण्यास मदत करत नाही, तर ब्रँडचा पाठिंबा वाढवून कंपन्यांना स्पर्धात्मक फायदे देते. BFSI क्षेत्र डिजिटल बदलांचा सामना करत असताना, ग्राहककेंद्री दृष्टीकोनाचा स्वीकार केल्याने कंपन्यांना लवचिकता मिळत त्यांचा विकास सुनिश्चित होत आहे. त्यायोगे कंपन्या सतत बदलणाऱ्या गतिशील बाजारपेठेत यशस्वी होण्यासाठी सज्ज होत आहेत.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments