Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorizedशाश्वत कृषी संजीवनी या दुर्मिळ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन*  सर अल्बर्ट हॉवर्ड...

शाश्वत कृषी संजीवनी या दुर्मिळ ग्रंथाचे शनिवारी प्रकाशन*  सर अल्बर्ट हॉवर्ड यांच्या ‘ अॅन अॅग्रीकल्चरल टेस्टामेंट’ या १०० वर्षा पूर्वीच्या पुस्तकाचा अनुवाद 

 

 

पुणे, दिनांक ३ः सर अल्बर्ट हॉवर्ड यांनी १०० वर्षांपुर्वी अॅन अॅग्रीकल्चरल टेस्टामेंट’ हा भारतीय शेतीवरील गौरवशाली ग्रंथ लिहिला. त्याचा अनुवाद ‘शाश्वत कृषी संजीवनी’ या पुस्तकाद्वारे अभ्यासकांच्या भेटीला येत असून, शनिवारी (दिनांक ५ जुलै २०२५) त्याचे प्रकाशन होत आहे. शिवाजीनगर येथील महात्मा फुले कृषी महाविद्यालयातील डॉ. शिरनामे सभागृहात सकाळी १०:३० वाजता राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते हा प्रकाशन कार्यक्रम पार पडेल.

 

 

प्रमुख उपस्थिती खासदार मेधा कुलकर्णी यांची असेल तर अध्यक्षस्थानी महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख हे असतील. तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महानंद माने, प्रा. अनिल व्यास, डॉ. मदनगोपाल वार्ष्णेय, रविंद्र घाटपांडे, सोमदत्त पटवर्धन आणि अतुल मारणे हे मान्यवरही उपस्थित असतील. कार्यक्रमाचे आयोजन हे कृषी महाविद्यालय, सेवा वर्धिनी, भारतिय किसान संघ, माजी विद्यार्थी संघ, आय.आर.डी.ई. यांनी केले आहे. या ग्रंथातून भारतीय शेतीच्या पारंपरिक ज्ञानाची आणि शाश्वत पद्धतींची माहिती मराठीत उपलब्ध होणार आहे. शेतकरी, शेतीतज्ज्ञ आणि शेतीमध्ये स्वारस्य असलेल्या प्रत्येकासाठी उपयुक्त ठरणार आहे. कृषी महाविद्यालय, सेवा वर्धिनी, भा. किसान संघ, माजी विद्यार्थी संघ, आय.आर.डी.ई कार्यक्रमाचे आयोजक आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments