Sunday, September 6, 2026
Google search engine
HomeUncategorizedतनाएराने स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर्स प्रस्तुत केल्या 'प्रत्येक धाग्यामध्ये भारत' आता एकाच ठिकाणी...

तनाएराने स्वातंत्र्यदिनानिमित्त विशेष ऑफर्स प्रस्तुत केल्या ‘प्रत्येक धाग्यामध्ये भारत’ आता एकाच ठिकाणी उपलब्ध आहे, ग्राहकांची सणासुदीची खरेदी आनंद व समाधानदायक असावी यासाठी ब्रँड सज्ज

राष्ट्रीय, १४ ऑगस्ट, २०२५: भारताच्या ७९ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त, टाटा परिवारातील एक सदस्य, तनाएराने भारताच्या समृद्ध सांस्कृतिक विणकाम कलाकौशल्यांचा सन्मान करण्यासाठी आमंत्रित केले आहे आणि त्यासाठी ‘प्रत्येक धाग्यात भारत’ ही आपली संकल्पना आपल्या प्रत्येक स्टोरमध्ये साकार केली आहे. तनाएराच्या एकाच स्टोरमध्ये भारतातील सर्व भागांमधील वैविध्यपूर्ण आणि वैशिष्ट्यपूर्ण कलात्मक विणकामाचा अनुभव घेण्याची संधी उपलब्ध आहे. विणकामासाठी प्रसिद्ध असलेल्या, देशभरातील प्रदेशातील अनेक वैविध्यपूर्ण, हाताने विणलेल्या साड्या तनाएराने प्रस्तुत केल्या आहेत. तनाएरा स्टोरमधील प्रत्येक साडी म्हणजे शतकांपासून चालत आलेल्या परंपरेची आजच्या काळाला सुसंगत आणि साजेशी अशी व्याख्या. या निमित्ताने तनाएराने एक खास फेस्टिव्ह ऑफर देखील सादर केली आहे: दोन खरेदी केल्यावर १०% सूट किंवा ३ खरेदी केल्यावर १५% सूट. निवडक मर्चन्डाईजवर, मर्यादित काळासाठी या ऑफरचा लाभ घेता येईल.

दक्षिण भारतातील देवळांच्या नगरीमध्ये तयार करण्यात येणाऱ्या राजेशाही कांजीवरमपासून गंगेच्या घाटांचे सौंदर्य आणि वैभव घेऊन येणाऱ्या बनारसीपर्यंत, भागलपूरच्या टसर सिल्कची शान, राजकोटच्या इकतचा उत्साह, ग्राहकांना भारताच्या समृद्ध विणकाम कला व परंपरेची सफर घडवण्याची किमया तनाएरा ब्रँड करतो.

तनाएराचे सीईओ श्री अंबुज नारायण यांनी सांगितले, “साडी हा भारताचा अभिमान आहे, या वेशभूषेला संपूर्ण भारतभर आदर दिला जातो. तरीही साड्यांमध्ये कमालीचे वैविध्य आढळून येते. तनाएरामध्ये आम्ही स्वतःला प्रत्येक भारतीय महिलेच्या वारशाचा एक भाग मानतो, एका पवित्र सकाळी नेसण्यासाठी निवडलेल्या पहिल्या साडीपासून ते आयुष्यभर जीवापाड जपून ठेवून सद्गदित अंतःकरणाने पुढच्या पिढीकडे सोपवेपर्यंत प्रत्येक साडीसोबत आम्ही आहोत. आम्ही कलेक्शन डिझाईन करताना भारताच्या संस्कृतीमधील विविधतेचा विचारपूर्वक अंतर्भाव केला आहे, प्रत्येक साडी म्हणजे ती विणणाऱ्या कारागिरांचे कौशल्य, धैर्य आणि आवड यांचा संगम. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत, यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त तनाएरासोबत दुप्पट आनंद मिळवा.”

उत्कृष्ट कारागिरांनी अतिशय काळजीपूर्वक, अचूकपणे विणलेली प्रत्येक साडी कालातीत परंपरा आणि आधुनिक शान यांचा सुंदर मिलाप! हाताने विणलेल्या या साड्या परवडण्याजोग्या किमतींना उपलब्ध आहेत. सणासुदीचे दिवस जवळ येत आहेत, तनाएराचे हे वैभव अवश्य पहा, छोटेसे कौटुंबिक गेट-टुगेदर असो किंवा मोठा समारंभ, प्रत्येक प्रसंगासाठी साजेशा साड्या मिळण्याचे खात्रीचे ठिकाण म्हणजे तनाएरा.

तनाएरा स्टोरला आजच भेट द्या आणि भारताच्या समृद्ध वारशाचा एक अंश घरी घेऊन या.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments