Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedबहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी 27 ऑगस्टपर्यंत अर्ज करावेत

पुणे दि. 21: जिल्ह्यातील इतर मागासवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी इतर मागास बहुजन कल्याण विभागाअंतर्गत असलेल्या वसतिगृह, ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार व पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयम् योजनेतंर्गत वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्यास 27 ऑगस्ट 2025 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

बी.ए., बी.कॉम, बी.एस.सी, अशा 12 वी नंतरच्या अभ्यासक्रमामध्ये प्रवेश घेतलेल्या पदवी आणि एम.ए, एम.एस.सी. असे पदवी नंतरचे पदव्युत्तर अभ्यासक्रम (व्यवसायिक अभ्यासक्रम वगळून) या विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह तसेच अन्य योजना राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी 2025-26 या शैक्षणिक वर्षामध्ये https://hmas.mahalt.org या अधिकृत संकेतस्थळावर ऑनलाईन नोंदणी करून अर्ज सादर करावयाचे आहेत.

सुधारित शासकीय वसतीगृहाचे सन 2025-26 साठीचे प्रवेशाचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे. प्रवेश अर्ज ऑनलाईनरित्या 27 ऑगस्ट पर्यंत करावयाचे आहेत. अर्जांची छाननी 28 ऑगस्ट ते 2 सप्टेंबरपर्यंत होईल. गुणवत्तेनुसार पहिली निवड यादी अंतिम करून 3 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. या यादीनुसार प्रवेशाची अंतिम मुदत 12 सप्टेंबर अशी राहील. रिक्त जागेवर दुसऱ्या प्रतिक्षा यादीमधील विद्यार्थ्यांची गुणवत्तेनुसार निवड यादी 15 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध होईल. यानुसार विद्यार्थ्यांना प्रवेशाची अंतिम मुदत 23 सप्टेंबर 2025 अशी राहील, असे इतर मागास बहुजन कल्याण विभाग पुणे सहायक संचालक प्रदिप संकपाळ यांनी यांनी प्रसिद्ध पत्रकान्वये कळविले आहे.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments