Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedतुळशीबाग गणपतीचा सांस्कृतिक महोत्सव आता सातासमुद्रापलिकडे जर्मनीत रंगणार श्री तुळशीबाग मंडळाचा सांस्कृतिक...

तुळशीबाग गणपतीचा सांस्कृतिक महोत्सव आता सातासमुद्रापलिकडे जर्मनीत रंगणार श्री तुळशीबाग मंडळाचा सांस्कृतिक महोत्सव मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष : फ्रॅंकफर्ट मध्ये होणार महोत्सव

पुणे : मानाचा चौथा श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त जर्मनीतील फ्रॅकफर्ट येथे एक भव्य सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने सातासमुद्रापलिकडे राहाणाऱ्या भारतीय बांधवाना गणेशोत्सव साजरा करण्याचा आनंद घेता येणार आहे. लोकमान्य टिळकांचे वंशज रोहित टिळक यांच्या हस्ते, श्री तुळशीबाग गणरायाची प्रतिकृती जर्मनीतील नमस्ते लांगेन मंडळाला प्रदान करण्यात येणार आहे. भारतीय परंपरा आणि गणेशोत्सवाचे वैभव परदेशातील भारतीयांपर्यंत पोहोचविणारा हा महोत्सव, पुणेकरांसाठी अभिमानास्पद ठरणार आहे.

 

श्री तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, नमस्ते लांगेन आणि विश्व हिंदू परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने हा सांस्कृतिक महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तुळशीबाग गणपती मूर्तीची प्रतिकृती महोत्सवात विराजमान होणार आहे. मंडळाचे अध्यक्ष विकास पवार, कोषाध्यक्ष नितीन पंडित, आमदार हेमंत रासने यांची कन्या श्रेया रासने, प्रविण करपे, गौरव बोराडे, मयुरेश दळवी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

 

श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे नितीन पंडीत म्हणाले, नुकत्याच जाहीर झालेल्या राज्य गणेशोत्सवानिमित्त दरवर्षीप्रमाणे अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन होत असते. त्याच धर्तीवर परदेशात राहणाऱ्या भारतीय बांधवांसाठी प्रथमच हा विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. भारतीय संस्कृतीचा सुगंध जर्मनीत दरवळणार आहे. उत्सवात सुर संगम या नृत्य-गायन व विविध गुणदर्शनाचे सादरीकरण होणार आहे. गायक जितेंद्र भुरुक यांचा ‘सोलफुल किशोर कुमार’, तसेच राजेश दातार व प्रज्ञा देशपांडे यांची मराठी भावगीते आणि हिंदी गाणी रसिकांना ऐकायला मिळणार आहेत. त्यासोबतच योगेश सुपेकर यांचे निवेदन, विनोदी किस्से आणि स्थानिक कलाकारांचा सहभाग या कार्यक्रमाची रंगत वाढवणार आहेत

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments