पुणे, दि. २५ ऑगस्ट २०२५ – पीवायसी हिंदू जिमखाना आयोजित दुसऱ्या पीवायसी स्नुकर अँड बिलियर्डस लीग स्पर्धेत अंतिम लढतीत सुप्रीम एसेस संघाने क्यु मास्टर्स संघाचा ४-३ असा संघर्षपूर्ण पराभव करून विजेतेपद संपादन केले.
पीवायसी जिमखाना येथील स्नुकर अँड बिलियर्डस हॉल मध्ये पार पडलेल्या या स्पर्धेत अंतिम सामन्यात सुप्रीम एसेस संघाने क्यु मास्टर्स संघावर ४-३ असा विजय मिळवला. बिलियर्ड्स रेस टू १००मध्ये मास्टर्सच्या निशाद चौघुलेने एसेसच्या रणजीत पांडेचा १०२-८७ असा तर, ६ रेड स्नूकर दुहेरीत मास्टर्सच्या ईशान भालेने सौमित्र रानडेच्या साथीत संजीव पटेल व यश काळे यांचा ६३-४२ असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. ६रेड स्नूकर एकेरीत एसेसच्या कर्णा मेहताने योगेश लोहियाचा ४६-३१ असा कडवा प्रतिकार करत संघाची आघाडी कमी केली. त्यानंतर १५ रेड स्नूकर एकेरीत एसेसच्या निमिश कुलकर्णीने समीर सावलाचा ९४-५६ असा सहज पराभव करून संघाला बरोबरी साधून दिली. ब्लॅक बॉल शूट आउटमध्ये मास्टर्सच्या आनंद आपटेने दिलीप पुंडेचा ३-० असा पराभव करून संघाला आघाडी मिळवून दिली. ६रेड स्नूकर दुहेरीत एसेसच्या नकुल पटेल व राहुल मुंदडा यांनी मास्टर्सच्या उदयन भागवत व स्वरूप कुलकर्णी या जोडीचा ५९-४८ असा पराभव करून संघाचे आव्हान कायम राखले. अखेरच्या निर्णायक लढतीत ब्लु बॉल शूटआउटमध्ये एसेसच्या संजीव पटेलने सुरेख पॉटिंग करत संघाला विजय मिळवून दिला.
स्पर्धेतील विजेत्या सुप्रीम एसेस संघाला करंडक अशी पारितोषिके देण्यात आली. स्पर्धेचे पारितोषिक वितरण पीवायसी हिंदू जिमखानाचे सह सचिव सारंग लागू, क्लबचे समिती सदस्य अभिषेक ताम्हाणे, क्लबच्या बिलियर्ड्स विभागाचे सचिव नंदन डोंगरे आणि शिरीष साठे यांच्या हस्ते करण्यात आले.
निकाल: अंतिम फेरी:
सुप्रीम एसेस वि.वि.क्यु मास्टर्स ४-३(बिलियर्ड्स रेस टू १००: रणजीत पांडे पराभुत वि. निशाद चौघुले ८७-१०२; ६ रेड स्नूकर दुहेरी: संजीव पटेल/यश काळे पराभुत वि.ईशान भाले/सौमित्र रानडे ४२-६३; ६रेड स्नूकर एकेरी: कर्णा मेहता वि.वि.योगेश लोहिया ४६-३१; १५ रेड स्नूकर एकेरी: निमिश कुलकर्णी वि.वि.समीर सावला ९४-५६; ब्लॅक बॉल शूट आउट: दिलीप पुंडे पराभुत वि.आनंद आपटे ०-३; ६रेड स्नूकर दुहेरी: नकुल पटेल/राहुल मुंदडा वि.वि.उदयन भागवत/स्वरूप कुलकर्णी ५९-४८; ब्लु बॉल शूटआउट:
प्रकाश वाळंबे, निमिश कुलकर्णी, कर्णा मेहता, संजीव पटेल वि.वि.आमिर आजगांवकर, निशाद चौघुले, ईशान भाले, योगेश लोहिया १-०).
इतर पारितोषिके:
मोस्ट व्हर्सटाईल प्लेयर: अरुण बर्वे;
बेस्ट ब्लु शुटर: आरिन माळी;
बेस्ट डबल प्लेयर: संजीव पटेल/गिरीश दामले’
बेस्ट स्नूकर प्लेयर: निमिश कुलकर्णी;
बेस्ट बिलियर्ड्स प्लेयर: राजवर्धन जोशी;
गणेश फाळके पुरस्कार(बेस्ट ब्लॅक बॉल प्लेयर): आनंद आपटे;
व्हीव्ही रानडे पुरस्कार(बेस्ट सिनियर प्लेयर):
प्रकाश वाळंबे;
अक्षय गोहाड पुरस्कार(मोस्ट प्रॉमिसिंग प्लेयर): अनिकेत शिंदे;
सलील देशपांडे पुरस्कार(प्लेयर ऑफ द टूर्नामेंट): कर्णा मेहता;
मोस्ट ओउटस्टँडिंग परफॉर्मर:
निशाद चौघुले.


